मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Coromandel Express Accident: ओडिशात भीषण रेल्वे अपघात; एक्सप्रेस-मालगाडीची धडक, ५० प्रवाशांचा मृत्यू, १३२ जण जखमी, VIDEO

Coromandel Express Accident: ओडिशात भीषण रेल्वे अपघात; एक्सप्रेस-मालगाडीची धडक, ५० प्रवाशांचा मृत्यू, १३२ जण जखमी, VIDEO

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jun 02, 2023 08:50 PM IST

Coromandel Express derails : कोरोमंडलट्रेन एका मालगाडीला धडकली. मालगाडीला धडकल्यानंतरस्लीपरचे ३ कोच सोडून अन्य डबे रुळावरून खाली उतरले. प्राथमिक माहितीनुसार एक्सप्रेसचे १८ डबे रुळावरून घसरले.

Coromandel Express derails
Coromandel Express derails

कोलकाता - हावडा ते चेन्नई धावणाऱ्या कोरोमंडल एक्सप्रेस रेल्वेचा शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास मोठा अपघात झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार ओडिशा राज्यातील बालासोरपासून जवळपास ४० किलोमीटर अंतरावर हा अपघात झाला. कोरोमंडल ट्रेन एका मालगाडीला धडकली. मालगाडीला धडकल्यानंतर स्लीपरचे ३ कोच सोडून अन्य डबे रुळावरून खाली उतरले. प्राथमिक माहितीनुसार एक्सप्रेसचे १८ डबे रुळावरून घसरले.

दरम्यान, प्राथमिक माहितीनुसार १३२ प्रवासी जखमी झाले असून ५० प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. घटनास्थळी मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.  

 

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार या कोचमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवासी अडकले आहेत. स्थानिक लोकांकडून मदत व बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. ही ट्रेन चेन्नई सेंट्रल ते कोलकाता येथील शालीमार रेल्वे स्टेशन दरम्यान धावते. शुक्रवारी सायंकाळी कोरोमंडल एक्सप्रेस ओडिशा राज्यातील बालासोरजवळ एका मालगाडीला धडकली. ही धडक इतकी भीषण होती की, एक्सप्रेसचे १८ डबे रुळावरून खाली उतरले. या अपघातात १३२ जण जखमी झाले आहेत.

 

या अपघातात अनेक प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मात्र जखमींचा अधिकृत आकडा समोर आला नाही. मात्र अनेक लोक मृत्यूमुखी पडल्याची भीती व्यक्त केली जात आहे. एकाच मार्गावरून दोन गाड्या विरुद्ध दिशेने आल्याने हा भीषण अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार सिग्नल यंत्रणा खराब झाल्यामुळे दोन ट्रेन एकाच रुळावरून आल्या व त्यांच्या भीषण टक्कर झाली.

 

या अपघातात कोरोमंडल एक्सप्रेस ट्रेनला मोठे नुकसान झाले आहे. जवळपास संपूर्ण ट्रेन रुळावरून खाली उतरली आहे. हा अपघात शुक्रवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास झाला. हा अपघात इतका भीषण होता की, इंजिन मालगाडीवर चढले आहे.

अपघातानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ट्विट -

 

IPL_Entry_Point

विभाग