मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  ...तर राहुल गांधींची खासदारकी जाणार, भाजप खासदारच्या वक्तव्याची चर्चा, नियम काय सांगतो?

...तर राहुल गांधींची खासदारकी जाणार, भाजप खासदारच्या वक्तव्याची चर्चा, नियम काय सांगतो?

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Feb 13, 2023 03:02 PM IST

Rahul Gandhi: लोकसभेतील भाषणात राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देशातील उद्याेगपतींशी संबंध असल्याचे सांगत गंभीर आरोप केले होते.

Rahul Gandhi On Narendra Modi In Loksabha
Rahul Gandhi On Narendra Modi In Loksabha (HT)

Rahul Gandhi on Narendra Modi: लोकसभेतील भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेल्या टिप्पणीमुळे राहुल गांधी अडचणीत आले आहेत. लोकसभा सचिवालयाच्या वतीने राहुल गांधी यांना नोटीस बजावण्यात आली असून १५ फेब्रुवारीपर्यंत उत्तर मागवण्यात आले आहे. भाजपचे निशिकांत दुबे आणि संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशींनी ही टिप्पणी असंसदीय असल्याचे सांगून विशेषाधिकार हननाचा आरोप केला होता. राहुल गांधींनी पंतप्रधान यांच्यावर केलेल्या आरोपांचे पुरावे सादर करावेत. राहुल गांधी तसे करू शकले नाहीत तर, त्यांना माफी मागावी लागेल, अन्यथा लोकसभेची जागा गमवावी लागेल, असे भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले आहेत.

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावादरम्यान राहुल गांधी यांनी लोकसभेतील भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अनेक आरोप केले. देशातील काही उद्योगपतींच्या संपत्ती मोठी वाढ होत चालली असून त्यांचा मोदींशी संबंध असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले. त्यानंतर १० फेब्रुवारीला राहुल गांधी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याने नोटीस बजावण्यात आली आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर बोलताना राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात असंसदीय भाषा वापरली होती. तसेच दिशाभूल करणारे तथ्य मांडले होते. या प्रकरणी राहुल गांधी यांना ईमेलवरून नोटीस बजावण्यात आली.

कोणत्याही सदस्याला सभागृहातून बाहेर काढण्याचा किंवा निलंबित करण्याचा अधिकार सभापतींना आहे. कोणी स्पीकरच्या आदेशाचे उल्लंघन केल्यास त्याला निलंबित केले जाऊ शकते. लोकसभेच्या कार्यपद्धती आणि कामकाजाचे नियम ३७३, ३७४ आणि ३७४ (अ) अंतर्गत, एखाद्या सदस्याने सभागृहाच्या नियमांचे उल्लंघन केल्यास, त्याला जास्तीत जास्त पाच बैठकांसाठी किंवा उर्वरित सत्रासाठी निलंबित केले जाऊ शकते. येथेच राज्यसभेत नियम २५५ आणि २५६ अंतर्गत कारवाई केली जाऊ शकते.

IPL_Entry_Point