मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  हृदयद्रावक.. घशात आईचे दूध अडकल्याने बाळाचा मृत्यू, नैराश्येतून महिलेची मोठ्या मुलासह आत्महत्या
सांकेतिक छायाचित्र
सांकेतिक छायाचित्र

हृदयद्रावक.. घशात आईचे दूध अडकल्याने बाळाचा मृत्यू, नैराश्येतून महिलेची मोठ्या मुलासह आत्महत्या

17 March 2023, 16:14 ISTShrikant Ashok Londhe

२८ दिवसांच्या नवजात बाळाचा आईचे दूध पिताना श्वास कोंडून मृत्यू झाला. या घटनेमुळे धक्का बसलेल्या महिलेने आपल्या ७ वर्षाच्या मुलासह विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. ही घटना केरळ राज्यातील आहे.

केरळमध्ये एक दु:खद घटना समोर आली आहे. येथील इडुक्की जिल्ह्यातील उप्पुथरा येथे २८ दिवसांच्या नवजात बाळाचा आईचे दूध पिताना श्वास कोंडून मृत्यू झाला. या घटनेमुळे धक्का बसलेल्या महिलेने आपल्या ७ वर्षाच्या मुलासह विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, महिला व तिच्या मुलाचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढल्यात आले आहेत. 

ट्रेंडिंग न्यूज

केरळमध्ये मन पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. स्थानिक मीडिया रिपोर्टनुसार,  महिलेच्या २८ दिवसाच्या बाळाचा स्तनपान करताना मृत्यू झाला. डॉक्टरांनी सांगितले की, श्वास कोंडल्याने बाळाचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी घडली होती. या घटनेनंतर महिलेला इतका धक्का बसला की, तिने आपल्या सात वर्षाच्या मोठ्या मुलाला सोबत घेऊन विहिरीत उडी मारली व आपले जीवन संपवले. 

महिला कॅथप्पल येथील राहणारी होती. दोघांचे मृतदेह गुरुवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास बाहेर काढण्यात आले. नातेवाईकांनी सांगितले की, बाळाच्या मृत्यूनंतर महिला मानसिक धक्क्यात होती. बुधवार सायंकाळी बाळाच्या अंतिम संस्कारानंतर कुटूंबीय तिच्यावर नजर ठेऊन बोते. गुरुवार सकाळी जेव्हा कुटूंब चर्चमध्ये गेले त्यावेळी महिलेने आत्मघाती पाऊल उचलले. 

दूध पाजताना सावधानी बाळगा -

डॉक्टरांनुसार बाळाला दूध पाजताना खूप सावधानी बाळगणे गरजेचे आहे. बीबीसीच्या  रिपोर्टनुसार, जेव्हा आई मुलाला स्तनपान करत असते त्यावेळी सावधानी न बाळगल्यास मुलाचा मृत्यू होऊ शकतो. अनेकवेळी दूध मुलाच्या अन्ननलिकेत न जाता श्वास नलिकेत जाते. या नलिकेला ट्रॅकिया म्हणतात. श्वास नलिकेतून दूध फुफ्फुसात जाते व श्वास कोंडून बाळाचा मृत्यूही होऊ शकतो.

विभाग