मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  कोची समुद्रकिनाऱ्यावर इराणी नौकेतून २०० किलो हेरॉईन जप्त, NCB कडून ६ जणांना अटक

कोची समुद्रकिनाऱ्यावर इराणी नौकेतून २०० किलो हेरॉईन जप्त, NCB कडून ६ जणांना अटक

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Oct 06, 2022 06:35 PM IST

एनसीबीकडूनएका इराणी नावेतून मोठ्या प्रमाणात हेरॉईन जप्त करण्यात आले आहे. अमली पदार्थाबरोबरएनसीबीने नावेत असणाऱ्या सहा जणांना ताब्यात घेतले आहे.

इराणी नौकेतून २०० किलो हेरॉईन जप्त
इराणी नौकेतून २०० किलो हेरॉईन जप्त

नॉरकोटिक्स कंट्रोल ब्यूरो (Narcotics control bureau) ने भारतीय नौदल (Indian Navy) सोबत एक संयुक्त अभियान राबवून कोची समुद्रकिनाऱ्यावर २०० किलो अमली पदार्थ जप्त केले आहे. एनसीबीकडून एका इराणी नावेतून मोठ्या प्रमाणात हेरॉईन जप्त करण्यात आले आहे. अमली पदार्थाबरोबर एनसीबीने नावेत असणाऱ्या सहा जणांना ताब्यात घेतले आहे.

तपास यंत्रणेकडून या अमली पदार्थचा तपास सुरू केला आहे. ड्रग्स तस्करीसाठी कोटी समुद्रकिनारा मुख्य मार्ग राहिला आहे. यापूर्वीही येथे मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. या कारणामुळे एनसीबी आणि भारतीय नौदलाची टीम सदैव सतर्क राहतात.

मुंबईमध्ये ८० कोटींचे हेरॉइन जप्त -

दुसरीकडे मुंबई एअरपोर्टवर बुधवारी कस्टम विभागाकडून ८० कोटी रुपये किंमतीचे १६ किलो हेरॉईन जप्त केले बोते. एका अधिकाऱ्याने सांगितले की, एका प्रवाशाच्या समानाची झडती घेतल्यानंतर त्याच्याकडे अमली पदार्थ आढळले.

डीआरआय अधिकाऱ्याने सांगितले की, हे हेरॉइन एका ट्रॉली बॅगेच्या आत लपवले गेले होते. पोलिसांनी सांगितले की, आरोपी केरळचा रहिवाशी आहे.

 

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या

विभाग