मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Shree Anna : अर्थसंकल्पात उल्लेख झालेले ‘श्री अन्न’ म्हणजे नेमकं काय? उत्पादन वाढल्यास काय होणार?

Shree Anna : अर्थसंकल्पात उल्लेख झालेले ‘श्री अन्न’ म्हणजे नेमकं काय? उत्पादन वाढल्यास काय होणार?

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Feb 01, 2023 07:32 PM IST

Nirmala Sitharaman Speaks About Millets or Shree Anna : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन दिवसांपूर्वी मन की बात मध्ये श्री अन्नाचा उल्लेख करत जगात यावर संशोधन तसेच याचे उत्पादन वाढावे अशी अपेक्षा व्यक्त केली होती. आजच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री सीतरामन यांनी देखील श्री अन्न याचा उल्लेख करत यावर संशोधन केंद्र उभारण्याची घोषणा केली. नेमके हे श्री अन्न काय आहे, जाणून घेऊयात

Nirmala Sitharaman Speaks About Millets
Nirmala Sitharaman Speaks About Millets

What Is Millets And its Benefits : पंत प्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन दिसांपूर्वी मन की बात मध्ये मिलेट्समुळे (श्री अन्न) शरीराला काय फायदे होतात या बद्दल सांगत याचे उत्पादन वाढल्यास जगात अन्न धान्याचा तुटवडा पडणार नसल्याचे त्यांनी सांगितले होते. दरम्यान, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी देखील आज त्यांच्या भाषणात मिलेट्सचा उल्लेख केला. यावर संशोधन करण्यासाठी खास केंद्र उभारण्याची घोषणा त्यांनी केली. तसेच उत्पादन वाढीसाठी देशात प्रयत्न केले जातील असे देखील सांगितले. दरम्यान, संयुक्त राष्ट्रांनी गेल्या वर्षी भारत सरकारच्या पुढाकाराने २०२३ हे “आंतरराष्ट्रीय मिलेट्स वर्ष” म्हणून घोषित केले. नेमके हे मिलेट्स अन्न नेमके काय आहे. त्याचा शरीराला काय फायदा होतो, जाऊन घेऊयात.

मिलेट्स म्हणजे भरडधान्य. या मिलेट्सचे महत्व आणि आणि त्याचे फायदे अर्थमंत्री सुद्धा मिलेट्सचे महत्त्व अधोरेखित केले. श्री अन्न हे संपूर्ण पोषक आहार असून भारतात याला श्रीअन्न म्हंटले जाते. त्यामुळे भविष्यात अन्नटंचाई बघता याचे उत्पादन वाढले गरजेचे आहे. त्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे अर्थमंत्री म्हणल्या.

मिलेट्स म्हणजे भरडधान्य असून हे धान्य भरडून त्याचा वापर आहारात केला जातो. भारतात पूर्वी आहारात याचा सर्वाधिक वापर केला जात होता. मात्र, आता हे धान्याचे उत्पादन हे कमी होऊ लागले आहे. या धान्याचे साल काढून त्यानंतर ते दगडी जात्यावर दळून त्याचे पीठ करून ते जेवणात वापरले जात होते.

साधारणत: मिलेट्स मध्ये ज्वारी, बाजरी, राळे, वरई, नाचणी, कोदो, राजगिरा, डेंगळी यांचा समावेश होतो. गहू-तांदूळ यात ग्लुटेन हा घटक असल्याने या दोघांचा भरडधान्यांत समावेश होत नाही. भरडधान्यात ग्लुटेन हा घटक नसतो.

ग्लुटेनमुळे शरीराला अनेक तोटे होऊ शकतात. त्याचा परिणाम शरीरावर होऊ शकतो. याउलट भरडधान्यांत असणाऱ्या विविध पोषणमूल्यांमुळे मधुमेह, रक्तक्षय रोखण्यासाठी सुद्धा मदत होऊ शकते.

IPL_Entry_Point

विभाग