मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Ayodhya UP : मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेणं पडलं महागात; मायावतींकडून दोन नेत्यांची बसपातून हकालपट्टी

Ayodhya UP : मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेणं पडलं महागात; मायावतींकडून दोन नेत्यांची बसपातून हकालपट्टी

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Apr 10, 2023 02:26 PM IST

Eknath Shinde Ayodhya Visit : अयोध्येत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यामुळं बसपाच्या दोन नेत्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

Lucknow: BSP supremo Mayawati addresses a press conference, at party office in Lucknow, Monday, April 10, 2023. (PTI Photo/Nand Kumar)(PTI04_10_2023_000056A)
Lucknow: BSP supremo Mayawati addresses a press conference, at party office in Lucknow, Monday, April 10, 2023. (PTI Photo/Nand Kumar)(PTI04_10_2023_000056A) (PTI)

Eknath Shinde Ayodhya Visit : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच अयोध्या दौरा पूर्ण केला आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली आहे. लखनौ आणि अयोध्येतील अनेक कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. परंतु बहुजन समाज पार्टीच्या दोन नेत्यांना मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेणं चांगलंच महागात पडलं आहे. कारण आता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचं कारण देत मायावती यांनी बसपा नेते राजकिशोर सिंह आणि ब्रिजकिशोर सिंह यांची पक्षातून हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे लखनौमार्गे अयोध्येत आले असता बसपा नेते राजकिशोर सिंह आणि ब्रिजकिशोर सिंह यांनी त्यांची भेट घेतली होती. यावेळी दोन्ही नेते शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा होत्या. त्यानंतर या घटनेची बसपाच्या प्रमुख मायावती यांनी गंभीर दखल घेत दोन्ही नेत्यांना पक्षातून काढून टाकलं आहे. त्यामुळं आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्यामुळं उत्तर प्रदेशात राजकीय वादंग पेटण्याची चिन्हं आहेत. बहुजन समाज पार्टीनं एक पत्रक जारी करत दोन्ही नेत्यांची हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती दिली आहे.

बसपा म्हणजे बुडणारी बोट- राजकिशोर सिंह

मायावती यांचा पक्ष बहुजन समाजवादी पार्टी म्हणजे बुडणारी बोट आहे. त्यामुळं बुडणाऱ्या या बोटीतून आम्हाला योग्य वेळी उतरावं लागणार असल्याचं राजकिशोर सिंह यांनी म्हटलं आहे. स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर पुढचा निर्णय घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. राजकिशोर सिंह आणि ब्रिजकिशोर सिंह हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत लवकरच प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे.

IPL_Entry_Point