मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral Video: भयानक! एस्केलेटरने गिळला आख्खा माणूस; जुना व्हिडिओ पुन्हा व्हायरल!

Viral Video: भयानक! एस्केलेटरने गिळला आख्खा माणूस; जुना व्हिडिओ पुन्हा व्हायरल!

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Jan 24, 2023 12:44 PM IST

Escalator Viral Video: एस्केलेटरवरून जात असताना एका व्यक्तीसोबत भयंकर घटना घडली, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे.

Viral Video
Viral Video

Viral Video: सोशल मीडियावर नेहमीच नवनवीन व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यापैकी काही व्हिडिओ मनोरंजनासाठी तयार केले जातात. तर, काही व्हिडिओ पाहून अनेकांच्या भुवया उंचवतात. अशाच एका घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. ज्यात एस्केलेटरने अख्खा माणून गिळल्याचे दिसत आहे. या व्हिडिओमुळे मॉल किंवा मेट्रोसारख्या ठिकाणी एस्केलेटरचा वापर करणाऱ्या नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

बीबीसीने दिलेल्या माहितीनुसार, ही घटना फेब्रुवारी २०१८ मध्ये तुर्कीच्या इस्तंबूलमधील अयाजगा मेट्रो स्टेशनवर घडली होती. पण या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर पुन्हा व्हायरल झाला आहे. ज्यात एक व्यक्ती एस्केलेटरेने खाली उतरताना दिसत आहे. पण अचानक इस्केलटरमध्ये तांत्रिक बिघाड झाला. त्यानंतर इस्केलेटरने अख्खा माणूस आत ओढून घेतला. मेहमत अली एरिक असे एस्केलेटरमध्ये पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. इतर प्रवाशांनी त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, पण ते अपयशी ठरली. अखेर अग्निशमन दलाच्या जवानांनी त्यांची सुटका सुखरूप केली

 

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ पाहून नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. @0ddIyterrifying या ट्विटर हँडलवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत ७० हजारांहून व्ह्यूज मिळाले आहेत. तर शेकडो लोकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे. व्हिडीओ पाहणारे युजर्स त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिले की, 'मला एस्केलेटरवरून जाताना भिती वाटत नव्हती, पण हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मला भिती वाटू लागली आहे. ' दुसर्‍या यूजरने लिहिले की, ' यापुढे एस्केलेटरवरून जाताना मी अधिक काळजी घेईल असे म्हटलंय. तर, एका व्यक्तीने असं म्हटलंय की, मी यापुढे पायऱ्यांचा वापर करेल.

IPL_Entry_Point

विभाग