होळी साजरी करायला माहेरी आली आणि तलावात बुडाली, वाचवताना पती आणि भावांचाही मृत्यू
Four Drown in Pond: मध्य प्रदेशातील रतलाम जिल्ह्यातील तलावात नवविवाहित दाम्पत्यासह चौघांचा मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ माजली आहे.
Madhya Pradesh: मध्य प्रदेशातील रतलाम जिल्ह्यातील तलावात आंघोळीसाठी गेलेल्या नवविवाहित दाम्पत्यासह ४ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक उघडकीस आली आहे. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे. मृत महिला आपल्या पतीसह होळी साजरी करण्यासाठी माहेरी आली असताना ही दुर्घटना घडली.या दुर्घटनेवर शोक व्यक्त करत मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आर्थिक मदत जाहीर केली आहे.
ट्रेंडिंग न्यूज
मिळालेल्या माहितीनुसार, रुपा कटारा असे मृत महिलेचे नाव आहे. गेल्या महिन्यात तिचे लग्न झाले असून होळी साजरी करण्यासाठी पतीसह तिच्या माहेरी आली होती. दरम्यान, तरुणी पती आणि दोन भावंडासह तलावात अंघोळीसाठी गेली होती. त्यावेळी तिचा एक भाऊ पाण्यात बुडू लागल्याने त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात इतर तिघेही पाण्यात बुडाले. या घटनेत चौघांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.
या घटनेवर मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दु:ख व्यक्त केले. रतलामच्या जामथूनमध्ये एका आदिवासी कुटुंबातील चार जणांचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुःखद आहे. या हृदयद्रावक अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी चार लाखांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. या कठीण काळात सरकार मृतांच्या कुटुंबियाच्या पाठीशी आहे, अशा आशयाचे ट्विट मुख्यमंत्र्यांनी केले आहे.