मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Shocking: जन्मदात्या पित्याची हत्या करून सावत्र आईवर बलात्कार; तरूणाला अटक

Shocking: जन्मदात्या पित्याची हत्या करून सावत्र आईवर बलात्कार; तरूणाला अटक

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Mar 08, 2023 05:42 PM IST

Odisha Shocking: ओडिशात जन्मदात्या पित्याची हत्या केल्यानंतर आरोपीने सावत्र आईवर बलात्कार केल्याच्या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.

Crime
Crime

Odisha Murder: ओडिशातील जाजपूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका २० वर्षाच्या तरुणाने जन्मदात्या पित्याची हत्या करून सावत्र आईवर बलात्कार केल्याची माहिती समोर आली आहे. पीडित महिलेच्या तक्रारीवरून स्थानिक पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीची सावत्र आई त्याला वडिलांसोबत राहू देत नसल्याने तो दुसऱ्या गावात राहत होता. दरम्यान, रविवारी आरोपी वडिलांच्या घरी आला आणि त्याच्या आईशी गैरवर्तन करु लागला. त्यावेळी आरोपी आणि त्याच्या वडिलांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर वाद विकोपाला गेल्याने आरोपीने धारदार शस्त्राने वडिलांची हत्या केली. वडिलांची हत्या केल्यानंतर आरोपीने सावत्र आईवर बलात्कार करुन घटनास्थळावरुन पळ काढला.

पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरुन टोमका पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. टोमका पोलिस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक एसके पात्रा यांनी सांगितले की, आम्ही आरोपीला ताब्यात घेतले आहे. तसेच मृत व्यक्तीचे मृतदेह शवविच्छेदनासाठी जवळच्या रुग्णालयात पाठवण्यात आले. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

लग्नाचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अनेकदा बलात्कार

नाशिक येथे लग्नाचे आमिष दाखवत एका अल्पवयीन मुलीवर अनेकदा बलात्कार करण्यात आला.याशिवाय, तिला अमानुष मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. पीडिताच्या तक्रारीनंतर आरोपी तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहे.

IPL_Entry_Point

विभाग