मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  दिराशी प्रेमसंबंध व सरकारी नोकरी मिळवण्यासाठी पत्नीनेच केली पतीची हत्या

दिराशी प्रेमसंबंध व सरकारी नोकरी मिळवण्यासाठी पत्नीनेच केली पतीची हत्या

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Mar 07, 2023 11:58 PM IST

प्रेमप्रकरण व सरकारी नोकरीच्या लालसेतूनएका व्यक्तीची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे.आरोपी पत्नीने पतीच्या हत्येसाठी सुपारी दिली होती.

सांकेतिक छायाचित्र
सांकेतिक छायाचित्र

उत्तर प्रदेशातील रामपूरमध्ये प्रेमप्रकरण व सरकारी नोकरीच्या लालसेतून एका व्यक्तीची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. आरोपी पत्नीने पतीच्या हत्येसाठी सुपारी दिली होती. मृत पती पॉवर स्टेशनमध्ये लाइन कुली पदावर कार्यरत होता. मृताच्या भावाने केलेल्या तक्रारीनुसार पत्नी आणि तिच्या प्रियकरासह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. 

ही घटना सिव्हिल लाईन्स कोतवाली परिसरातील अशोक विहार कॉलनीतील आहे. राजीव कुमार असे मृताचे नाव असून ते सदर तालुक्यातील पॉवर हाऊसमध्ये काम करत होते. राजीवचा भाऊ चंद्रपाल सिंहच्या म्हणण्यानुसार, त्याचा भाऊ आणि वहिनीचे संबंध चांगले नव्हते. वहिनी सीमा हिचे दुरचा नातेवाईक राहुलसोबत प्रेमसंबंध निर्माण झाले होते. दोघांचेही एकमेकांवर प्रेम होते. सीमाला राजीवला मार्गातून हटवायचे होते तसेच त्याची सरकारी नोकरी मिळवायची होती. तिला नोकरी आणि प्रेम दोन्ही मिळायचे होते. याबाबत तिने प्रियकर राजीवला मारण्याचा कट रचला. सीमानेही पती हरवल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केली होती. मात्र पोलिसांना संशय आल्याने त्यांनी पोलिसी खाक्या दाखवताच तिने संपूर्ण हकीकत कथन केली. 

पोलिसांसमोर सीमाने कबूल केले की, तिचे दूरचा नातेवाईक राहुलवर प्रेम होते. दोघांनाही एकत्र राहायचे होते. त्यामुळे तिने प्रियकरासह कट रचून पतीला मारण्यासाठी १ लाख ६२ हजारांची सुपारी अरुण, रवी आणि सतीश यांना दिली होती. २७ फेब्रुवारी रोजी या तिघांनी राजीवला शहजादनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अहमदाबाद गावात नेले, जिथे त्यांनी त्याची हत्या करून मृतदेह झुडपात लपवला. यानंतर सीमाने २८ फेब्रुवारी रोजी राजीव बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली.   

IPL_Entry_Point

विभाग