मराठी बातम्या  /  Nation And-world  /  Live News Updates 31 May 2023: Maharashtra Breaking News Updates Today

Live News Updates 30 May 2023(HT)

Live News Updates 31 May 2023: राज ठाकरे यांचा महिला कुस्तीपटूंना पाठिंबा; पंतप्रधान मोदींना पत्र

Raj Thackeray: राज ठाकरे यांचा महिला कुस्तीपटूंना पाठिंबा; पंतप्रधान मोदींना पत्र

Wed, 31 May 202304:48 PM IST

नागपुरातील प्रसिद्ध टेकडी गणेश मंदिरातही ड्रेसकोड लागू

नागपुरातील प्रसिद्ध टेकडी गणेश मंदिरातही आता ड्रेसकोड लागू करण्यात येणार आहे. महाराष्ट्र मंदिर महासंघाकडून वस्त्र संहिता जारी करण्यात आली आहे. नागपुरात सुरुवातीला ४ मंदिरांनी ड्रेसकोड लागू केला. आता यामध्ये नागपुरातील टेकडी गणेश मंदिरही सहभागी झाले आहे. 

Wed, 31 May 202302:51 PM IST

राज ठाकरे यांचा महिला कुस्तीपटूंना पाठिंबा; पंतप्रधान मोदींना लिहिलं पत्र

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महिला कुस्तीपटूंना पाठिंबा जाहीर केला आहे. याबाबत ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहिलं आहे. ‘महिला कुस्तीपटू न्यायासाठी आक्रोश करत असताना २८ मे ला ज्या पद्धतीने त्यांची जशी फरफट झाली तशी फरफट पुन्हा होऊ नये. तसंच आपण स्वतः ह्या विषयांत लक्ष घालून त्यांचं म्हणणं ऐकून घ्यावं आणि सन्मानजनक तोडगा काढावा व भारतीय क्रीडाजगताला आश्वस्त करावं’, अशी विनंती राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली आहे.

राज ठाकरे यांचा महिला कुस्तीपटूंना पाठिंबा; पंतप्रधान मोदींना लिहिलं पत्र
राज ठाकरे यांचा महिला कुस्तीपटूंना पाठिंबा; पंतप्रधान मोदींना लिहिलं पत्र

Wed, 31 May 202311:50 AM IST

अहमदनगरचं नाव आता आहिल्यानगर होणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

औरंगाबद आणि उस्मानाबादनंतर आता अहमदनगरच्या नामांतराची मोठी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. अहमदनगरचे नामांतर अहिल्यादेवी नगर केलं जाणार, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चौंडी एका कार्यक्रमात केली. 

Wed, 31 May 202310:14 AM IST

खासदार बाळू धानोरकर अनंतात विलीन, अनेक दिग्गज नेत्यांची उपस्थिती

चंद्रपूरचे दिवंगत खासदार बाळू धानोरकर अनंतात विलीन झाले आहेत. वरोऱ्यात त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. बंदुकीच्या फैरी झाडून पोलीस दलाकडून सलामी देण्यात आली. मोक्षधाम या ठिकाणी अत्यंत शोकाकुल वातावरणात बाळू धानोरकर यांना निरोप देण्यात आला. दोन्ही मुलांनी मिळून वडिलांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला.

Wed, 31 May 202306:59 AM IST

Rupali Chakankar: रुपाली चाकणकर लोकसभेच्या रिंगणात उतरणार

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी लोकसभेच्या रिंगणात उतरणार आहेत. त्यांनी खडकवासला मतदारसंघातून उमेदवारी मागितली असल्याची माहिती समोर आली आहे.

Wed, 31 May 202306:05 AM IST

bank of Maharashtra :   दुर्बँल घटकांसाठी महाबँकेची वित्तीय योजना

देशाच्या सार्वजनिक बँकिंग क्षेत्रातील एक अग्रगण्य बँक असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्रने देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या निमित्य समाजातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील वंचित घटकांना वित्तीय सहाय्य पुरविण्यासाठी वित्तीय समावेशन शिबिरे आयोजित केली होती. मुंबई व मुंबई दक्षिण, उत्तर मुंबई व ठाण्यातील ठिकाणी समाजातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील वंचित घटकांना वित्तीय सहाय्य पुरविण्यासाठी वित्तीय समावेशन शिबिरे आयोजित केली होती.

Wed, 31 May 202305:12 AM IST

Opening Bell :  नफावसूलीचा दबाव, सेन्सेक्सची २५० अंश घसरणीने सुरुवात

कमकुवत जागतिक संकेतांमुळे बुधवारी शेअर बाजार लाल चिन्हात उघडला. चौफेर विक्रीमुळे सेन्सेक्स आणि निफ्टी या प्रमुख निर्देशांकांमध्ये मोठी घसरण झाली आहे. बीएसई सेन्सेक्स  सुरुवातीला सुमारे २५० अंकांनी घसरल्यानंतर ६२,७०० च्या पातळीवर व्यवहार करत आहे. त्याचप्रमाणे निफ्टीही ७७ अंकांनी घसरून १८५५० च्या पातळीवर पोहोचला आहे. आज बँकिंग स्टाॅक्समध्ये नफावसूलीचे चित्र दिसून आले. 

Wed, 31 May 202304:51 AM IST

NCP : इंडिक टेल्स वेबसाइटवर कारवाई करा; राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घेतली मुंबईच्या पोलीस आयुक्तांची भेट

'इंडिक टेल्स' या वेबसाइटनं सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आक्षेपार्ह लिखाण केल्याचा राष्ट्रवादी काँग्रेसनं तीव्र निषेध केला आहे. या वेबसाइटवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं आज मुंबई पोलीस आयुक्तालयासमोर निदर्शनं केली. विरोधी पक्षनेते अजित पवार, छगन भुजबळ, जयंत पाटील, खासदार सुनिल तटकरे आदी नेत्यांनी मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची भेट घेऊन मागण्यांचं निवेदन दिलं.

Wed, 31 May 202304:35 AM IST

GSHSEB: गुजरात बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर

गुजरात माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता 12वीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर केला आहे.

Wed, 31 May 202302:45 AM IST

Delhi Rains: राजधानी दिल्लीत पावसाची हजेरी

Delhi Rains: देशाची राजधानी दिल्लीच्या काही भागात आज पावसाने हजेरी लावली आहे.

Wed, 31 May 202301:58 AM IST

Pune Fire: पुण्यातील वाघोली येथील एका गोदामाला भीषण आग

महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील वाघोली परिसरातील पुणे-अहमदनगर रस्त्यावरील एका गोदामाला बुधवारी पहाटे आग लागल्याची घटना उघडकीस आली आहे.

Wed, 31 May 202301:01 AM IST

Hyderabad Fire: हैदराबादमधील सेकंड हँड कार शोरूमला आग लागली

तेलंगणाच्या हैदराबादमधील सेकंड हँड कार शोरूमला आग लागली. मंगळवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास ही आग लागली. या आगीत अनेक गाड्या जळून खाक झाल्या आहेत. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.