मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  काश्मीरमध्ये २ दहशतवादी हल्ल्यात ६ हिंदूंची हत्या, लहान मुलेही दहशतवाद्यांच्या निशाण्यावर

काश्मीरमध्ये २ दहशतवादी हल्ल्यात ६ हिंदूंची हत्या, लहान मुलेही दहशतवाद्यांच्या निशाण्यावर

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jan 02, 2023 07:35 PM IST

terrorists targeting hindus family : काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी रविवारी केलेल्या ४ हिंदूंची हत्या केली होती. त्यानंतर आज झालेल्या आयईडी स्फोटात दोन लहान मुलांचा मृत्यू झाला आहे.

दहशतवादी हल्ल्यात ६ हिंदूंची हत्या
दहशतवादी हल्ल्यात ६ हिंदूंची हत्या

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून हिंदूंना लक्ष्य करण्याच्या घटना नव्या वर्षात वाढल्या आहेत. या केंद्रशासित प्रदेशात गेल्या दोन दिवसांत ६ हिंदूंची हत्या करण्यात आली आहे. दहशतवादी लहान मुलांनाही सोडत नाहीत.राजौरीतील डांगरी गावात दहशतवादी हल्ल्यात बळी पडलेल्यांच्या घराजवळ सोमवारी आयईडी स्फोट झाला, त्यात २ मुले ठार आणि ६ जण जखमी झाले. ४ वर्षीय विहान आणि १६ वर्षीय समिक्षा अशी मृतांची नावे आहेत. याशिवाय जखमींमध्ये दोन मुलांचाही समावेश असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

याआधी रविवारी संध्याकाळी दहशतवाद्यांनी याच भागातील तीन घरांवर गोळीबार केला होता, त्यात ४ नागरिक ठार झाले होते आणि ६ जण जखमी झाले होते. सतीश कुमार (४५), दीपक कुमार (२३), प्रीतम लाल (५७) आणि शिशुपाल (३२) अशी मृतांची नावे आहेत. या दोन्ही दहशतवादी घटना अवघ्या १४ तासांच्या अंतराने घडल्या आहेत.

दहशतवादी हल्ल्यातील बळी प्रीतम लाल यांच्या घराजवळ स्फोट -
प्रत्यक्षदर्शींनी दावा केला की, आज सकाळी दहशतवादी हल्ल्यातील बळी प्रीतम लाल यांच्या घराजवळ स्फोट झाला. मृतांव्यतिरिक्त,सर्व जखमी देखील हिंदू आहेत,ज्यांची ओळख सानवी शर्मा (४), कनाया शर्मा (१४), वंशू शर्मा (१५), समिक्षा देवी (२०), शारदा देवी (३८), कमलेश देवी (५५) आहेत. या जखमी झालेल्या समिक्षा शर्मा हिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की सोमवारी सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास हा स्फोट झाला जेव्हा रविवारच्या हल्ल्यातील पीडिताच्या नातेवाईकांसह अनेक लोक घरात उपस्थित होते.

अल्पसंख्याक समाज दहशतीत –

सरपंच दीपक कुमार म्हणाले की, पोलिस आणि सुरक्षा यंत्रणांच्या सुरक्षेतील ही गंभीर चूक आहे. ते म्हणाले की, अल्पसंख्याक समाजातील लोकांना सुरक्षित वाटत नाही. प्रशासनाने कठोर पावले उचलावीत. त्याचवेळी लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी जम्मू-काश्मीरच्या डांगरी गावात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्यांना सोडले जाणार नाही, असा इशारा दिला आहे. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांना १० लाख रुपये आणि सरकारी नोकरीची घोषणा त्यांनी केली आहे.

हिंदूंवरील हिंसाचाराच्या विरोधात निर्देशने -
हिंदूंवरील हिंसाचाराच्या विरोधात राजौरी शहरासह जिल्हाभरात निदर्शने सुरू झाली आहेत. हे लोक त्यांच्या सुरक्षिततेची आणि न्यायाची मागणी करत आहेत. दरम्यान,एनआयएचे एक पथक डांगरी येथे पोहोचले असून प्राथमिक तपास सुरू आहे. त्याचवेळी जम्मूचे विभागीय आयुक्त रमेश कुमार यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारीही घटनास्थळी पोहोचले आहेत. ते म्हणाले की, लष्कर आणि पोलिस मोठ्या प्रमाणावर शोध मोहीम राबवत आहेत. या प्रकरणाची चौकशी करण्यात येत असून संपूर्ण परिसराची नाकाबंदी करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

 

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या