मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  'नमस्ते ट्रम्प'साठी मोदी सरकारनं केला होता लाखोंचा खर्च; RTI मधून नेमका आकडा समोर

'नमस्ते ट्रम्प'साठी मोदी सरकारनं केला होता लाखोंचा खर्च; RTI मधून नेमका आकडा समोर

Suraj Sadashiv Yadav HT Marathi
Aug 18, 2022 05:39 PM IST

Donald Trump: २०२० मध्ये अमेरिकेच्या तत्कालीन अध्यक्षांच्या आणि कुटुंबाच्या स्वागतासाठी मोदी सरकारने 'होऊ दे खर्च' म्हणत पैसे खर्च केल्याची माहिती आता समोर आली आहे.

२०२० मध्ये डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांचे कुटुंबिय भारत दौऱ्यावर आले होते.
२०२० मध्ये डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांचे कुटुंबिय भारत दौऱ्यावर आले होते.

Donald Trump: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे २०२० मध्ये राष्ट्राध्यक्ष असताना भारत दौऱ्यावर आले होते. पहिलाच भारत दौरा करताना ते पत्नी मोनालिसा, मुलगी इवांका आणि जावई जेरेड कुशनर यांच्यासोबत आले होते. या दौऱ्यात अधिकारीही होते. अहमदाबाद, आग्रा आणि दिल्लीला त्यांनी भेट दिली होती. दरम्यान, अमेरिकेच्या तत्कालीन अध्यक्षांच्या आणि कुटुंबाच्या स्वागतासाठी मोदी सरकारने 'होऊ दे खर्च' म्हणत पैसे खर्च केल्याची माहिती आता समोर आली आहे. माहिती अधिकारातून तेव्हा करण्यात आलेल्या खर्चाबाबत धक्कादायक माहिती समोर आलीय.

केंद्रीय सूचना आयोगाकडे आरटीआयअतंर्गत माहिती विचारण्यात आली होती. अवघ्या ३६ तासांच्या दौऱ्यासाठी तब्बल ४० लाख रुपये खर्च झाले होते. परराष्ट्र मंत्रालयाने याबाबतची माहिती केंद्रीय सूचना आयोगाला दिली आहे. केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे भारतात ३६ तासांसाठी आले होते. या शासकीय दौऱ्याचा आणि त्यांच्या खाण्यापिण्याचा खर्च एकूण ३८ लाख रुपये आला होता. जवळपास ४० लाख रुपये इतकी रक्कम डोनाल्ड ट्रम्प यांच्या दौऱ्यात खर्च करण्यात आली होती.

माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे त्यांच्या पूर्ण फॅमिलीसह भारत दौऱ्यावर आले होते. त्यावेळी थेट अहमदाबादला भेट दिली होती. त्यानतंर आग्रा, दिल्ली असा दौरा ट्रम्प यांनी केला होता. तेव्हा डोनाल्ड ट्रम्प यांनी नरेंद्र मोदी यांच्या मैत्रीची चर्चाही होत होती. अहमदाबादमध्ये ट्रम्प यांनी जनसमुदायाला संबोधित केलं होतं.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या