मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  'अग्निवीरांना वर्षभरात ३० सुट्ट्या', हवाई दलाने सांगितल्या योजनेच्या अटी

'अग्निवीरांना वर्षभरात ३० सुट्ट्या', हवाई दलाने सांगितल्या योजनेच्या अटी

Suraj Sadashiv Yadav HT Marathi
Jun 19, 2022 11:31 AM IST

अग्निपथ योजनेतून हवाई दलात भरती होणाऱ्या अग्निवीरांच्या वर्दीपासून प्रशिक्षणापर्यंत आणि वेतनापासून ते सुट्ट्यांपर्यंत मिळणाऱ्या सुविधांची माहिती सरकारने दिली आहे.

एअर चिफ मार्शल व्हीआर चौधरी
एअर चिफ मार्शल व्हीआर चौधरी (फोटो - पीटीआय)

भारताच्या हवाई दलाने (Indian Air Force) अग्निपथ योजनेंतर्गत (Agneepath Scheme) होणाऱ्या नव्या भरतीसाठी नोटिफिकेशन जारी केलं आहे. देशभरात अग्निपथ योजनेला विरोध होत असताना हवाई दलाने या नोटिफिकेशनमधून अग्निवीरांना कोणत्या अटी असतील आणि त्यांना काय सुविधा मिळतील याची माहिती दिली आहे. अग्निपथ योजनेंतर्गत लष्करात दाखल होणाऱ्यांची पात्रता काय असावी, त्यांची वर्दी कशी असेल, वेतन किती असेल, सुट्ट्या किती मिळतील, प्रशिक्षण कसं असेल याबाबत माहिती हवाई दलाकडून देण्यात आली आहे.

अग्निपथ योजनेत ज्या भारतीय तरुणाचे वय १७.५ ते २१ वर्षे असेल त्यांना अर्ज करता येईल. त्याआधी वैद्यकीय चाचणी द्यावी लागेल. अग्निवीरसुद्धा हवाई दलाच्या इतर जवानांना जी पदके आणि पुरस्कार मिळतात त्यासाठी पात्र असतील. तसंच वर्षभरात त्यांना ३० पगारी सुट्ट्या मिळतील तर वैद्यकीय सुट्ट्या आरोग्य तपासणीनुसार दिल्या जातील.

प्रशिक्षण कालावधीत त्यांना सरकारी आरोग्य सेवा मिळतील. मात्र प्रशिक्षण कालावधीत काही विशिष्ट परिस्थिती वगळता त्यांना मधेच सोडून जाण्याची परवानगी मिळणार नाही. अग्निपथ योजनेंतर्गत पहिल्या वर्षी ३० हजार रुपये वेतन मिळेल त्यातील २१ हजार रुपये थेट खात्यावर जमा होतील तर उर्वरित ९ हजार रुपये अग्निवीर कॉर्प्स फंडात जातील. दर वर्षी वेतनवाढ होईल. प्रशिक्षणाच्या शेवटच्या वर्षात अग्निवीरांना ४० हजार रुपये वेतन असेल.

प्रशिक्षणानंतर ४ वर्षांनी ७५ टक्के अग्निवीर निवृत्त होतील. त्यांना १० लाख ४ हजार रुपये सेवा निधी म्हणून दिले जातील. यातील पाच लाख दोन हजार रुपये त्यांच्याच कमाईतील असतील. याशिवाय सरकारकडून कोणत्याही प्रकारची ग्रॅच्युइटी किंवा इतर निधी दिला जाणार नाही. सेवाकाळात ४८ लाख रुपयांचा जीवन विमा मिळेल.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या