मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  रत्न परिधान करताना घ्या या १० गोष्टींची काळजी, अन्यथा होऊ शकतं नुकसान

रत्न परिधान करताना घ्या या १० गोष्टींची काळजी, अन्यथा होऊ शकतं नुकसान

Dilip Ramchandra Vaze HT Marathi
Jul 14, 2022 08:59 AM IST

Ratna Shastra: ज्योतिषी ग्रहानुसार वेगवेगळी रत्ने (Gems)घालण्याची शिफारस करतात. पण तुम्हाला माहित आहे का की कोणतेही रत्न परिधान करताना काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे असते.

काय सांगतं रत्न परिधान करताना शास्त्र
काय सांगतं रत्न परिधान करताना शास्त्र (हिंदुस्तान टाइम्स)

Rules for gemstones: ग्रहांचे अशुभ प्रभाव कमी करण्यासाठी रत्न घालावं असं ज्योतिषशास्त्रात सांगितलं आहे. पण तुम्हाला माहित आहे का, की कोणतेही रत्न धारण करण्यापूर्वी काही नियम जाणून घेणे आवश्यक आहे, अन्यथा धनहानी होण्याची शक्यता असते. असे म्हटले जाते की रत्न धारण करण्यापूर्वी नियमांचे पालन केले नाही तर ग्रहांचा अशुभ प्रभाव आणखी वाढू शकतो. रत्न धारण करताना ज्योतिषशास्त्रात दिलेले नियम जाणून घ्या.

१. कोणतेही रत्न खरेदी करण्यासाठी चांगल्या ज्योतिषाची मदत घ्यावी. रत्ने नेहमी अस्सल खरेदी करावीत.

२. एकदा रत्न धारण केले की ते पुन्हा पुन्हा काढणे टाळावे. असे केल्याने रत्नाचा प्रभाव कमी होतो असे म्हणतात.

३. कोणतेही तुटलेले रत्न परिधान करू नये. रत्नाचा रंग निघाला असला तरी तो काढावा.

४. रत्न धारण करताना, त्वचेला स्पर्श करणे आवश्यक आहे. असे मानले जाते की मगच एखाद्याला रत्नाचा लाभ होतो.

५.रत्न धारण करताना मंत्रांचा योग्य प्रकारे जप करून ते धारण करावे.

६. एखाद्याने दुसर्‍याचे रत्न घालू नये किंवा ते इतरांनी परिधान करू नये.

७. रत्न नेहमी त्याच्याशी संबंधित धातूमध्ये धारण केले पाहिजे. असे केल्याने धातूचा शुभ प्रभावही प्राप्त होतो.

८. ज्योतिषांच्या मते, नीलम आणि हिरा सर्वच व्यक्तींना शोभत नाही, त्यामुळे ज्योतिषाच्या सल्ल्यानंतरच ते परिधान करावे.

९. रत्न नेहमी ज्योतिषाच्या सल्ल्यानेच खरेदी करावे. रत्नाच्या वजनाचीही काळजी घेतली पाहिजे.

१०. ज्योतिष शास्त्रानुसार अमावस्या, ग्रहण आणि संक्रांतीच्या दिवशीही रत्ने धारण करू नयेत.

IPL_Entry_Point

विभाग