मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Facebook, Instagram Blue Tick: फेसबूक, इन्स्टाग्रामवर ब्लू टीक हवीय? सोपी पद्धत घ्या जाणून

Facebook, Instagram Blue Tick: फेसबूक, इन्स्टाग्रामवर ब्लू टीक हवीय? सोपी पद्धत घ्या जाणून

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Feb 22, 2023 06:00 PM IST

Facebook, Instagram Blue Tick: सोशल मीडियावर ब्लू टीक मिळवण्यासाठी अनेकजण उत्सूक असतात.

Facebook, Instagram
Facebook, Instagram

How to Get Blue Ticks on Facebook And Instagram: फेसबूक, इंस्टाग्राम हे जगातील प्रसिद्ध सोशल नेटवर्किंग अॅप असून त्यांच्या वापरकर्त्यांची संख्या एक अब्जाहून अधिक आहे. सामान्य नागरिकांपासून ते देशी-विदेशी सेलिब्रिटींपर्यंत सगळेच फेसबूक, इंस्टाग्रामचा वापर करतात. मात्र,निवडक लोकांच्या अकाऊंटवर तुम्हाला ब्लू टीक पाहायला मिळते, ज्यात राजकीय, मनोरंजक, क्रिडासह विविध क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तींचा समावेश आहे. ब्लू टिकसाठी लोक खूप उत्सुक असतात. मात्र, आता फेसबूक, इन्स्टाग्रामच्या कोणत्याही वापरकर्त्यांना ब्लू टीक मिळवता येणार आहे, त्यासाठी खालील माहिती फायद्याची ठरेल.

ब्लू टिक म्हणजे काय?

फेसबूक, इंस्टाग्रामवर अनेकांच्या अकाऊंटवर निळ्या रंगाची टिक पाहिली असेल. एखाद्या सेलिब्रिटी किंवा नेत्याच्या अकाउंटवरही ब्लू टिक तुम्ही अनेकदा पाहिली असेल. याचा अर्थ हे खाते अधिकृत आहे.

फेसबूकवर ब्लू टीक मिळवणे

-फेसबूकवर ब्लू टीक मिळण्यासाठी वापरकर्त्याला सर्वात प्रथम सेटींग्जमध्ये जावा लागेल.

- सेटिंग्जमध्ये गेल्यानंतर तुम्हाला Page verification किंवा Account Verification असा पर्याय दिसेल.

- पेज व्हेरिफिकेशनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर फोन क्रमांक किंवा दस्ताऐवज पडताळणी असे दोन पर्याय येतील, यापैकी एकाची निवड करायची आहे.

- समोर दिसणाऱ्या फॉर्ममध्ये विचारलेली माहिती भरल्यानंतर तुम्हाला सरकार मान्य कागदपत्र अपलोड करावे लागेल.

- यानंतर फेसबूक तुमच्या अर्जाचे पुनरावलोकन करेल, तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास तुमच्या नावासमोर ब्लू टीक येईल.

 

इन्स्टाग्रामवर ब्लू टीक कसे मिळवायचे?

- सर्वप्रथम इन्स्टाग्राम अकाऊंट उघडा.

- लॉग इन केल्यानंतर, तळाशी असलेल्या तुमच्या प्रोफाइल फोटोवर क्लिक करा.

-प्रोफाईल फोटोवर क्लिक केल्यानंतर उजवीकडे वरच्या बाजूला दाखवलेल्या आडव्या रेषांवर क्लिक करा.

- यानंतर तुम्हाला सेटींग्समध्ये जाऊन अकाउंट पर्यायावर क्लिक करावे लागले, तिथे ब्लू टीकसाठी रिक्वेस्ट व्हेरिफिकेशन्स हा पर्याय दिसेल.

- समोर दिसणाऱ्या फॉर्ममध्ये विचारलेली माहिती भरल्यानंतर तुम्हाला सरकार मान्य कागदपत्र अपलोड करावे लागेल.

- यानंतर इन्स्टाग्राम तुमच्या अर्जाचे पुनरावलोकन करेल, तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास तुमच्या नावासमोर ब्लू टीक येईल.

IPL_Entry_Point

विभाग