Pervez Musharraf Passes Away: पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेझ मुशर्रफ यांचे आज (०५ फेब्रुवारी २०२३) निधन झाले. वयाच्या ७९ वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला होता. मुशर्रफ दीर्घकाळापासून आजारी होते. त्यांच्यावर दुबईतील रुग्णालयात अनेक महिन्यांपासून उपचार सुरू होते. मात्र, आज उपचारदरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
परवेझ मुशर्रफ यांचा जन्म ११ ऑगस्ट १९४३ रोजी नवी दिल्लीतील दर्यागंज येथे झाला होता. दरम्यान, १९४७ मध्ये त्यांच्या कुटुंबाने पाकिस्तानला जाण्याचा निर्णय घेतला. फाळणीच्या काही दिवस आधी त्यांचे संपूर्ण कुटुंब पाकिस्तानात स्थलांतरीत झाले. परवेझ मुशर्रफ यांनीच १०९९ मध्ये तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ यांना न सांगता भारताविरुद्ध कारगिल युद्ध सुरू केले होते. लष्करप्रमुख असताना त्यांनी सत्तापालट करून पाकिस्तानात मार्शल लॉ जाहीर केला होता.