मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Du Syllabus : सारे जहाँ से अच्छा हिंदुस्ताँ हमारा… लिहिणारे कवी इक्बाल यांचा धडा अभ्यासक्रमातून काढला जाणार

Du Syllabus : सारे जहाँ से अच्छा हिंदुस्ताँ हमारा… लिहिणारे कवी इक्बाल यांचा धडा अभ्यासक्रमातून काढला जाणार

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
May 27, 2023 12:37 PM IST

muhammad iqbal chapter in DU Syllabus : दिल्ली विद्यापीठाच्या शैक्षणिक परिषदेनं मोहम्मद इक्बाल यांच्यावरील धडा अभ्यासक्रमातून वगळण्याचा निर्णय घेतला आहे.

Delhi University
Delhi University

DU Syllabus news : सारे जहाँ से अच्छा हिंदुस्ताँ हमारा… हम बुलबुले हैं इसकी, ये गुलसित हमारा… हे अजरामर काव्य लिहिणारे प्रसिद्ध शायर व उर्दू कवी मोहम्मद इक्बाल यांच्यावरील धडा दिल्ली विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून वगळण्यात येणार आहे. दिल्ली विद्यापीठाच्या शैक्षणिक परिषदेनं शुक्रवारी अभ्यासक्रमातील बदलांना मंजुरी दिली आहे. त्यात इक्बाल यांच्यावरील धड्याचाही समावेश आहे.

इक्बाल हे भारतीय उपखंडातील आघाडीच्या उर्दू आणि पर्शियन कवींपैकी एक आहेत. ते पाकिस्तानचे राष्ट्रीय कवी होते. पाकिस्तानच्या निर्मितीत त्यांचंही योगदान असल्याचं बोललं जातं. त्यांच्यावरील धडा आता दिल्ली विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून बाद होण्याची शक्यता आहे.

Chhattisgarh Naxal Arrest : नोटा बदलायला आलेल्या नक्षलवाद्यांना अटक, छत्तीसगड पोलिसांची मोठी कारवाई

विद्यापीठाचे कुलसचिव विकास गुप्ता यांनी ही माहिती दिली. विद्यापीठाच्या शैक्षणिक परिषदेनं फाळणी, हिंदू आणि आदिवासी विषयक अभ्यासासाठी स्वतंत्र अध्यासन स्थापन करण्याच्या प्रस्तावांनाही मान्यता दिली आहे. इक्बाल यांच्यावरील धडा बीए राज्यशास्त्राच्या ‘मॉडर्न इंडियन पॉलिटिकल थॉट’ मध्ये समाविष्ट होता. या निर्णयाला विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेची अंतिम मंजुरी आवश्यक आहे. ९ जून रोजी ती मिळण्याची शक्यता आहे.

अभाविपनं केलं निर्णयाचं स्वागत

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (ABVP) दिल्ली शाखेनं इक्बाल यांच्यावरील धडा वगळण्याच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. मोहम्मद इक्बाल हे कट्टर धार्मिक विद्वान होते. ते ‘पाकिस्तानचे वैचारिक जनक’ म्हणून ओळखले जातात. जिना यांना मुस्लिम लीगमध्ये नेते म्हणून पुढं आणण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. भारताच्या फाळणीला मोहम्मद अली जिना जितके जबाबदार आहेत, तितकेच मोहम्मद इक्बालही जबाबदार आहेत, असं अभाविपनं म्हटलं आहे.

संतापजनक! धरणात पडलेला अधिकाऱ्याचा मोबाइल शोधण्यासाठी २१ लाख लीटर पाणी वाया घालवलं!

पाच सदस्यांनी केला विरोध

दिल्ली विद्यापीठाच्या शैक्षणिक परिषदेवर १०० हून अधिक सदस्य आहेत. या परिषदेत इक्बाल यांना अभ्यासक्रमातून वगळण्यावर जवळपास दिवसभर चर्चा झाली. पाच सदस्यांनी फाळणीवरील अभ्यासक्रम हटविण्यास विरोध केला. हा फूट पाडणारा प्रस्ताव आहे. १३०० वर्षांपूर्वीची अतिक्रमणं, छळ आणि गुलामीचा अभ्यास करायला लावण्याचा सरकारचा हेतू दिसतो, असं मत या सदस्यांनी नोंदवलं.

IPL_Entry_Point

विभाग