मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  China crisis : चीनमध्ये आर्थिक मंदीची चाहूल? ‘या’ बड्या कंपनीने १० हजार कर्मचाऱ्यांना दिला नारळ

China crisis : चीनमध्ये आर्थिक मंदीची चाहूल? ‘या’ बड्या कंपनीने १० हजार कर्मचाऱ्यांना दिला नारळ

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Aug 11, 2022 04:40 PM IST

जून तिमाहीदरम्यान ९२४१ हून अधिक कर्मचाऱ्यांना अलीबाबा कंपनीने नारळ दिला आहे. कारण कंपनीने आपल्या आपल्या एकूण कर्मचाऱ्यांची संख्या कमी करून २,४५,७०० केली.

चीनमध्येआर्थिक मंदीची चाहूल?
चीनमध्येआर्थिक मंदीची चाहूल?

China crisis : मागील काही दिवसांपासून जगभर चर्चा सुरू आहे की, चीनमधील अनेक बड्या कंपन्या आर्थिक संकटाशी झुंजत आहेत. दरम्यान चीनमधील तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी अलिबाबाविषयी रिपोर्ट्स आले आहेत की, कंपनीची आर्थिक स्थिती खूपच खराब झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार अलिबाबा कंपनीने जूनच्या तिमाहीत आपल्या जवळपास १० हजार कर्मचाऱ्यांना नोकरीतून काढले आहे. इतकेच नाही तर कामावरून कमी करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या यावर्षी १३ हजार हून अधिक झाला आहे. 


दरम्यान, साउथ चायना मॉर्निग पोस्टच्या एका रिपोर्टनुसार जून तिमाहीदरम्यान ९२४१ हून अधिक कर्मचाऱ्याने अलीबाबा कंपनी सोडली. कारण कंपनीने आपल्या आपल्या एकूण कर्मचाऱ्यांची संख्या कमी करून २,४५,७०० केली. याचा अर्थ आहे कि, कंपनीने बाकी कर्मचाऱ्यांना कामावरून काढले किंवा त्यांना नोटीस दिली. इतकेच नाही तर पहिल्या सहा महिन्यात कंपनीने एकूण १३,६१६ कर्मचाऱ्यांना नारळ दिला. 

अलीबाबाच्या संचालकाचे म्हणणे - 
मार्च २०१६ नंतर कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या संख्येत पहिल्यांदाच घट झाली आहे. मात्र यावर कंपनीने आपला तर्क दिला आहे. रिपोर्टनुसार अलीबाबाचे चेअरमन आणि सीईओ डेनियल झांग योंग यांनी म्हटले की, कंपनी या वर्षी जवळपास ६ जार नव्या पदवीधरांना आपल्या कंपनीत स्थान दिली. मात्र एक्सपर्ट्सनी शंका व्यक्त केली ही, सेल्समध्ये कमी व चीनमध्ये आर्थिक मंदीच्या कारणामुळे हे पाऊल उचलले गेले आहे. मात्र परिस्थितीत इतकी बिघडलेली नाही. 

काय आहे खरे कारण - 
काही रिपोर्ट्समध्ये अलीबाबाच्या वर्तमान स्थितीचा आढावा घेण्यात आला आहे. अलीबाबाच्या जून तिमाहीमध्ये नेट इनकममध्ये ५० टक्के घट होऊन २२.७४ अब्ज युआन (३.४ अब्ज डॉलर) राहिला. मागील वर्षाच्या तिमाहीत कंपनीचे उत्पन्न ४५.१४ अब्ज युआन राहिली होती. रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, कंपनी आपल्या खर्चात घट व एफिशियन्सी वाढवण्यावर काम करत आहे. याचा परिणाम कंपनीच्या कामगिरीवर पडला आहे. 

संस्थापक जॅक मा यांच्यावर तीनी सरकारची करडी नजर!
अलीबाबाचे फाउंडर जॅक मा आहेत. ते मागच्या वेळी तेव्हा चर्चेत आले जेव्हा त्यांना चीन सरकारविरोधात केलेल्या विधानामुळे नुकसान सहन करावे लागले होते. इतकेच नव्हे तर मागील काही दिवसांपासून चीनी रेगुलेटर टेक कंपन्यांच्या विरोधात कडक कारवाई करत आहेत. याच कारणामुळे जॅक मा आपल्या काही वोटिंग पावर एंट नुसार कंपनीवरील नियंत्रण सोडू शकतात.

IPL_Entry_Point

विभाग