मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Shocking: मुलाच्या चुकीची शिक्षा बापाला; अपमान सहन न झाल्यानं त्यानं स्वत:चं आयुष्यचं संपवलं
Crime (Representative Use)
Crime (Representative Use) (HT_PRINT)

Shocking: मुलाच्या चुकीची शिक्षा बापाला; अपमान सहन न झाल्यानं त्यानं स्वत:चं आयुष्यचं संपवलं

14 March 2023, 11:17 ISTAshwjeet Rajendra Jagtap

Madhya Pradesh Suicide: मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यात एका व्यक्तीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.

Madhya Pradesh Crime: मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातून हृदय हेलवून टाकणारी घटना घटना घडली आहे. समाजातील मुलीसोबत पळून गेलेल्या मुलाच्या पित्याला गावाच्या मध्यभागी असलेल्या झाडाला बांधून अपमानास्पद वागणूक देण्यात आली. संपूर्ण गावासमोर मुलीच्या नातेवाईकांनी इज्जत वेशीला टांगल्याच्या विरहातून मुलाच्या पित्याच्या गळफास लावून आत्महत्या केली. याप्रकरणी मुलीच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

ट्रेंडिंग न्यूज

उधा अहिरवार असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. उधा यांचा मुलगा समाजातील मुलीसोबत पळून गेला. यामुळं संतप्त झालेल्या मुलीच्या कुटुंबियांनी उधाला झाडाला बांधून मारहाण तसेच शिवीगाळ केली. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला होता. ज्यात उधा यांची पत्नी त्यांना खायला घालण्याचा प्रयत्न करत आहे. तर, त्याठिकाणी उभे असलेल्या ग्रामस्थांनी फक्त बघ्याची भूमिका घेतल्याचे दिसत आहे. मुलीच्या कुटुंबियांकडून मिळालेली अपमानास्पद वागणुकीच्या विरहातून उधा यांनी दोन दिवसानंतर गळफास लावून आत्महत्या केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीच्या कुटुंबियांकडून मिळालेल्या वागणुकीमुळे उधा यांनी आत्महत्या केल्याचा आरोप त्यांच्या पत्नीने केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी मुलीच्या कुटुंबियांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहे.

विभाग