मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Video : कुत्र्यांना खायला देताना तरुणीला कारनं उडवलं, थरकाप उडवणारा प्रकार कॅमेऱ्यात कैद

Video : कुत्र्यांना खायला देताना तरुणीला कारनं उडवलं, थरकाप उडवणारा प्रकार कॅमेऱ्यात कैद

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Jan 17, 2023 10:44 AM IST

Chandigarh Road Accident: चंदीगढमध्ये घराशेजारच्या भटक्या कुत्र्यांना खायला देत असताना भरधाव कारने तरूणीला धडक दिली.

Chandigarh Road Accident
Chandigarh Road Accident

Road Accident: चंदिगढमध्ये भटक्या कुत्र्यांना खायला देत असताना एका तरूणीला भरधाव कारने उडवल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना मागच्या आठवड्यात शनिवारी (१४ जानेवारी) रात्री घडली. या घटनेत संबंधित तरूणी जखमी झाली असून तिच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याच घटनेचे सीसीटीव्ही फूटेज समोर आले, ज्यात एसयूव्ही कारचालक तरुणीला धडक देऊन निघून गेल्याचे दिसत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तेजस्विता असं कारच्या धडकेत जखमी झालेल्या तरूणीचे नाव आहे. तेजस्विता मागच्या आठवड्यात शनिवारी तिच्या आईसोबत घराशेजारच्या भटक्या कुत्र्यांना खायला द्यायला गेली होती. त्यावेळी मागून आलेल्या एका एसयूव्ही कारने तिला धडक दिली. या घटनेमध्ये तेजस्विता गंभीर जखमी झाली. त्यानंतर तेजस्विता आईने तिच्या कुटुंबियांना मदतीसाठी बोलावले. तेजस्विताला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे माहिती मिळत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रस्त्यावरील कुत्र्यांना खायला देत असताना भरधाव कारने तरूणीला धडक देऊन पळ काढला. याप्रकरणी अज्ञात कारचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. ही घटना सेक्टर 53 मध्ये घडली असून महिलेवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

IPL_Entry_Point

विभाग