मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  ५ हजार वर्षापूर्वीही लोक जात होते रेस्टॉरंट व पब, ‘या’ संस्कृतीत पाण्यापेक्षा जास्त पीत होते बिअर!

५ हजार वर्षापूर्वीही लोक जात होते रेस्टॉरंट व पब, ‘या’ संस्कृतीत पाण्यापेक्षा जास्त पीत होते बिअर!

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Feb 15, 2023 01:07 PM IST

south Iraq Sumerian civilization : पुरातत्व शास्त्रज्ञांनी इराकमध्ये ५,०००वर्षे जुन्या पबचा शोध घेतला आहे. सुमेरियनसंस्कृतीतील लोकांसाठी बिअर हे अतिशय सामान्य पेय होते.लोक पाण्यापेक्षा जास्त बिअरपीत होते.

south Iraq Sumerian civilization
south Iraq Sumerian civilization

पब आणि रेस्टॉरंटमध्ये जाण्याचा छंद आजच्या तरुणांमध्ये सामान्य गोष्ट बनली आहे. तथापि,  तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, हा छंद नवीन नाही किंवा आधुनिकीकरणाची देन नाही. तर सुमारे पाच हजार वर्षापूर्वीही  पब आणि रेस्टॉरंट्स अस्तित्वात होते.  पुरातत्व शास्त्रज्ञांनी  इराकमध्ये ५,००० वर्षे जुन्या पबचा शोध घेतला आहे. त्यामुळे त्या काळातील लोकांचे जीवन जाणून घेण्यास मदत होईल. इराकमधील नसिरियाजवळील लगश हे शहर सुमेरियन सभ्यतेसाठी ओळखले जाते. येथे उत्खननादरम्यान सुमेरियन संस्कृतीचे अनेक पुरावे आढळले आहेत.

अमेरिका आणि इटलीच्या टीमला येथे एक रेस्टॉरंट आढळले आहे. युनिव्हर्सिटी ऑफ पेनसिल्व्हेनिया आणि पिसा युनिव्हर्सिटी यांनी संयुक्तरित्या शोध घेत एक जुनी रेफ्रिजरेशन सिस्टीम आणि खूप मोठ्या चुलीचा शोध घेतला आहे. येथे खाण्यापिण्यासाठी लाकडी बेंच आणि सुमारे दीडशे भांडी आढळून आली आहे. येथे मासे आणि जनावरांची हाडेही सापडली आहेत. याशिवाय दारू पिण्याची भांडीही सापडली आहेत. 

प्रोजेक्ट डायरेक्टर हॉली पिटमन यांनी एएफपीला सांगितले की, येथे एक रेफ्रिजरेटर सापडला आहे.याशिवाय शेकडो भांडी सापडली आहेत. रेफ्रिजरेटरच्या मागे एक मोठा स्टोव्ह होता जो स्वयंपाकासाठी वापरला जात होता. हे असे सूचित करते की हे असे ठिकाण होते जेथे लोक नियमितपणे भेट देत असत.ते इथे खाण्यापिण्यासाठी येत असत. तसेच हे स्पष्ट होते की, हे कोणाचे घर नव्हते. 

त्यांनी म्हटले की, सुमेरियन संस्कृतीतील लोकांसाठी बिअर हे अतिशय सामान्य पेय होते. लोक पाण्यापेक्षा जास्त बिअर पीत होते. दक्षिण इराकमधील सुमेरियन सभ्यतेचा पुरावा असे सूचित करतो की त्या ठिकाणीच शेती सुरू झाली आणि लोकांनी घरे बांधण्यास सुरुवात केली. सुमेरियन राजांचे लगाश परिसरात राजवाडे होते. याशिवाय येथे बागकाम करण्यात आले. लगाश हे दक्षिण इराकमधील महत्त्वाचे शहर होते. एका पुरातत्वशास्त्रज्ञाने सांगितले की, येथे शेतीसोबतच मासेमारी आणि व्यापारही होत असे.उत्खननादरम्यान नमुने घेण्यात आले असून आता सविस्तर संशोधन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

 

IPL_Entry_Point