मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Zika Virus : पुण्यात झिका विषाणूचा रुग्ण आढळल्याने खळबळ; आरोग्य यंत्रणा अलर्ट

Zika Virus : पुण्यात झिका विषाणूचा रुग्ण आढळल्याने खळबळ; आरोग्य यंत्रणा अलर्ट

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Dec 02, 2022 07:35 PM IST

Zika virus in pune : पुण्यात झिका विषाणू बाधित रुग्ण आढळल्याने खळबळ माजली आहे. आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून रुग्णाच्या परिसरातील सर्वेक्षण करण्यात आले आहे.

पुण्यात झिका विषाणूचा रुग्ण आढळला
पुण्यात झिका विषाणूचा रुग्ण आढळला

पुणे –मुंबई-ठाण्यात गोवर आजाराने थैमान घातले असताना पुण्यात धोकादायक झिका विषाणूचा रुग्ण (Zika virus patient) आढळल्याने आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. पुण्यात आढळलेल्या झिका बाधित रुग्णावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. झिकाचा रुग्ण आढळल्याने पुणे महापालिकेची महापालिकेची आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा रुग्ण नाशिक जिल्ह्यातील असून कामानिमित्त तो पुण्यात आला होता. ऑक्टोबर महिन्यात तो सुरतला गेल्याची माहिती मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार १६ नोव्हेंबर रोजी संबंधित रुग्ण ताप,खोकला व सांधेदुखीची लक्षणे जाणवल्यानंतर पुण्यातील जहांगीर रुग्णालयात उपचारासाठी आला होता. रुग्णालयाने त्याचे नमुने घेऊन प्रयोगशाळेत पाठवले होते. त्यानंतर हा रुग्ण झिका बाधित असल्याचे समोर आले होते. यानंतर त्याचे नमुने पुण्यातील NIV कडे पाठवण्यात आले. NIV च्या तपासणीत ३० नोव्हेंबरला रुग्ण झिका बाधित असल्याचे निश्चित झाले.

हारुग्ण पुण्यातील बावधन येथे वास्तव्यासअसून झिका बाधित असल्याचे निदान झाल्यानंतर परिसरातील घरांचे महापालिकेकडून सर्वेक्षण करण्यात आले. मात्र त्यात एकही संशियत रुग्ण आढळला नाही. या भागात घरोघरी सर्वेक्षण,कंटेनर सर्वे करण्यात आले. पण कुठेही एडीस डास उत्पत्ती आढळली नाही. या भागात धूरफवारणी करण्यात आली, असून आरोग्य यंत्रणा सतर्क असल्याची माहिती पुणे महापालिकेकडून देण्यात आली आहे.

झिकाची लक्षणे कधीकधी अस्पष्ट असतात. त्याच्या सुरुवातीच्या लक्षणांमध्ये ताप, पुरळ, सांधेदुखी, स्नायू दुखणे,डोकेदुखी आणि उलट्या यांचा समावेश होतो. झिका विषाणूमुळे होणारा संसर्ग इतका धोकादायक आहे की त्यामुळे हॉस्पिटलमध्ये भरती होण्याची वेळ येऊ शकते. 

 

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या

विभाग