मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Samruddhi Mahamarg : समृद्धी हायवेवर नीलगायींचा कळप! प्राण्यांसाठीचा ओव्हरपास ठरला कुचकामी

Samruddhi Mahamarg : समृद्धी हायवेवर नीलगायींचा कळप! प्राण्यांसाठीचा ओव्हरपास ठरला कुचकामी

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Jan 18, 2023 11:49 AM IST

Samruddhi Mahamarg news : राज्यातील विकासाचा मार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर सर्रास वन्य प्राण्यांचा वावर असून महामार्गावरून जाणारे हे प्राणी अपघाला आमंत्रण देत आहेत.

समृद्धीवर निलगाईचा कळप ! अपघाताला आमंत्रण
समृद्धीवर निलगाईचा कळप ! अपघाताला आमंत्रण

नागपूर : विकासाचा महामार्ग असणारा समृद्धी महामार्गावर वन्य प्राण्यांचा मोठा वावर असून यामुळे अपघाला आमंत्रण दिले जात आहे. समृद्धी मार्गावरून नीलगायींचा कळप जात असतानाचा व्हिडिओ विदर्भातील प्राणी मित्र किशोर रिठे यांनी इंस्टाग्रामवर अपलोड केला आहे. अचानक महामार्गावर आलेल्या कळपामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. शिवाय या व्हिडिओमुळे या मार्गावर वन्य प्राण्यांसाठी बनवण्यात आलेले ओव्हरपास आणि अंडर पास हे फोल ठरले असल्याचे देखील सिद्ध झाले आहे.

समृद्धी महामार्गाचे नुकतेच लोकार्पण झाले आहे. नागपूर येथील एका भव्य कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा मार्ग सुरू करण्यात आला. हा मार्ग विदर्भातील तब्बल ३ अभयारंण्यातून जातो. येथील वन्य प्राण्यांना या मार्गाचा धोका होऊ नये, तसेच ते महामार्गावर येऊ नये यासाठी तब्बल ९ ठिकाणी ओव्हर पास आणि अंडर पास बनवण्यात आले आहेत. मात्र, असे असताना देखील वन्य प्राणी हे महामार्गावर येत असून अपघाताला कारणीभूत ठरत आहेत.

विदर्भातील प्राणी प्रेमी किशोर रिठे हे या मार्गाने प्रवास करत असतांना अचानक नीलगायींचा एक कळप महामार्गावर लावलेले कठडे ओलांडून आला. अचानक समोर आलेल्या नीलगायींमुळे चालकाने वाहन हळू केले. हा व्हिडिओ रिठे यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर उपलोड केला आहे. यात नीलगायीचा कळप हा मार्गावरून उड्या मारून जात असताना दिसत आहे.

या पूर्वीही या मार्गावर अनेक वन्य प्राण्यांचा वाहनांची धडक लागून मृत्यू झाला आहे. यात हरणे, नीलगायी तसेच कुत्र्यांचा समावेश आहे. या प्राण्यांमुळे वाहनांचे देखील नुकसान झाले आहे. रात्रीच्या वेळी जर एखादा प्राणी रस्त्यात आडवा आल्यास मोठा अपघात होण्याची शक्यता आहे.

हे प्राणी महामार्गावर येऊ नये यासाठी जे अंडर पास आणि ओव्हर पास बनवण्यात आले आहेत, ते सपेशल फेल गेले आहेत, हे या व्हिडिओ वरुन स्पष्ट झाले आहे.

IPL_Entry_Point

विभाग