मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  samruddhi mahamarg : समृद्धी महामार्गावर आतापर्यंत ३५ हून अधिक अपघात; काय आहेत कारणं?

samruddhi mahamarg : समृद्धी महामार्गावर आतापर्यंत ३५ हून अधिक अपघात; काय आहेत कारणं?

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Dec 28, 2022 01:40 PM IST

samruddhi mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून हा मार्ग वाहतुकीसाठी खुला झाल्यापासून तब्बल ३५ हून जास्त अपघात झाले आहेत.

Samruddhi Mahamarg Accident
Samruddhi Mahamarg Accident

samruddhi mahamarg Accident : राज्याच्या प्रगतीचा आणि समृद्धीचा महामार्ग असं वर्णनं करण्यात आलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग हा अपघातांचा मार्ग ठरत आहे. हा महामार्ग वाहतुकीसाठी खुला झाल्यापासून आजवर इथं ३५ अपघात झाले आहेत. आजच एका कारला झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळं समृद्धी एक्स्प्रेस वेवरील वाहतूक सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

मुंबई-नागपूर हा समृद्धी महामार्ग राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रकल्प होता. फडणवीस मुख्यमंत्री असल्यापासून या महामार्गाचं काम सुरू झालं होतं. याचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महामार्गाचं लोकार्पण करण्यात आलं आहे. लोकार्पण झाल्यानंतरच्या दुसऱ्याच दिवसापासून या महामार्गावर अपघात होत आहेत. आज वाशिममधील कारंजाजवळ अपघात झाल्यानं चिंता वाढली आहे.

samruddhi highway accident : समृद्धी महामार्गावर अपघात सुरूच; वाशिममधील कारंजाजवळ दोघांचा मृत्यू

आतापर्यंत झालेल्या अपघातांची कारणं वेगवेगळी असली तरी वाहनांचा वेग हे यामागचं प्रमुख कारण मानलं जात आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी समृद्धी महामार्गावरील वेगमर्यादेच्या संदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर गाडीचा वेग ताशी १०० किमी, इतर मार्गांवर ताशी ८० किमी असताना समृद्धी महामार्गावर १५० किमी ठेवण्यात आला आहे. ही तफावत का आहे? हा फरक करण्यामागचे निकष काय आहेत?, असा सवाल अजित पवार यांनी केला होता. हिवाळी अधिवेशनात या संदर्भातील प्रश्नाला उत्तर देताना महामार्गावर वेगमर्यादा ताशी १२० किलोमीटर असेल, असं सरकारच्या वतीनं सांगण्यात आलं होतं. तसंच, अपघात रोखण्यासाठी अन्य उपाय करण्याची ग्वाही देखील देण्यात आली होती. त्यानंतरही अपघाताचं सत्र सुरूच आहे.

IPL_Entry_Point