मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  राज्यात मुस्लिमांविरुद्ध ४ महिन्यात ५० मोर्चे, ‘लव जिहाद’अन् ‘लँड जिहाद’ मुद्द्यावरून तापतंय राजकारण

राज्यात मुस्लिमांविरुद्ध ४ महिन्यात ५० मोर्चे, ‘लव जिहाद’अन् ‘लँड जिहाद’ मुद्द्यावरून तापतंय राजकारण

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Mar 20, 2023 03:06 PM IST

love jihad and land jihad : महाराष्ट्रात मागील नोव्हेंबरपासून आतापर्यंत चार महिन्यात कमीत कमी ५० 'हिंदू जन आक्रोश मोर्चा'राज्यातील जवळपास सर्व ३६ जिल्ह्यात आयोजित करण्यात आले आहेत. या सर्व रॅलीमध्ये एकच पॅटर्न राबवला गेला.

सकल हिंदू मोर्चा
सकल हिंदू मोर्चा

महाराष्ट्रात मागील नोव्हेंबरपासून आतापर्यंत चार महिन्यात कमीत कमी ५० 'हिंदू जन आक्रोश मोर्चा'राज्यातील जवळपास सर्व ३६ जिल्ह्यात आयोजित करण्यात आले आहेत. या सर्व रॅलीमध्ये एकचपॅटर्नराबवला गेला. रॅलीमध्ये लोकांनी हातात भगवा झेंडा घेतला होता व डोक्यावर भगवी टोपी परिधान केली होती. अनेक लोकांनी गळ्यातही भगवे उपरणे लटकवले होते. याशिवाय या मोर्चांमध्ये आणखी एक समानता होती, ती म्हणजे या मोर्चांमध्ये वक्त्यांनीअल्पसंख्यकांविरुद्ध"लव जिहाद","लँड जिहाद", "जबरदस्तीने धर्मांतरण"आदि मुद्द्यांवर हल्लाबोल केला तसेचमुस्लिम समाजावरआर्थिक बहिष्काराचे आवाहन केले.

दरम्यान, या मोर्चांपासून भाजपने स्वत:ला बाजुला ठेवले वहा कार्यक्रम आरएसएसच्या छत्रछायेत वाढलेल्या सकल हिंदू समाजाचा असल्याचे सांगितले. मात्र या मोर्चांमध्ये भाजपचे स्थानिक आमदार व खासदार या मोर्चात सामील असल्याचे दिसले.

मार्चामध्ये भाजप नेत्यांऐवजी दुसरे कट्टरपंथी नेते भाषण देताना दिसून आले. यामध्ये निलंबित भाजप नेते व तेलंगानाचे आमदार टी राजा सिंह,कालीचरण महाराज आणि काजल हिंदुस्तानी आदि सामील आहे. या नेत्यांमध्ये दोन (सिंह आणि महाराज) राज्यात हेट स्पीच देण्याच्या आरोपांचा सामना करत आहेत.

सिंह यांना इस्लाम आणि पैगंबर मोहम्मद यांच्यावर टिप्पणी केल्याच्या आरोपात मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात भाजपमधून निलंबित करण्यात आले होते. तर कालीचरण महाराज ऊर्फ​​अभिजीत धनंजय सारंग महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील रहिवासी आहेत आणि महाराष्ट्रात हिंदू मोर्चाचा एक चर्चित चेहरा आहेत. त्यांना डिसेंबर २०२१ मध्ये रायपूरमध्ये एका धर्म संसदेत'हिंदू राष्ट्र'च्या प्रस्तावासाठी अटक करण्यात आली होती. त्या सभेत कालीचरण महाराज यांनी कथितरित्या नथूराम गोडसे याचे कौतुक केले होते. काजल हिंदुस्तानी उर्फ​​काजलसिंगला गुजरातमधील हिंदुत्ववादी कार्यकर्ता आहे.

१२ मार्च रोजी मुंबईतील मीरा रोडवर "इस्लामी आक्रामकता", "लव जिहाद" आणि "भूमी जिहाद" विरुद्ध अशाच प्रकारची एक रॅली आयोजित केली गेली होती. त्यामध्ये काही वक्त्यांनी मुस्लिमांवर आर्थिक बहिष्काराचे आवाहन केले होते. दोन किलोमीटर लांब रॅलीत स्थानक आमदार गीता जैन यांच्याशिवाय भाजप आमदार नितेश राणे आणि अन्य भाजप कार्यकर्ता आणि नेते समील झाले होते. महाराष्ट्र पोलिसातील अधिकारीही रॅलीत सामील झाले होते. जे रॅलीचे रेकॉर्डिंग करत होते.

हिंदू जन मोर्चा रॅली शिवाय संपूर्ण महाराष्ट्रात अशा प्रकारच्या रॅलींचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये हिंदू जनजागृती समिती, गोवा येथील एक संघटनेद्वारे आयोजित 'हिंदू राष्ट्र जागृती सभा'ही सामील आहे. या रॅलीमध्ये द्वेषवर्धक भाषणे झाली होती. या रॅलींचा उद्देश्य "हिंदूराष्ट्र"ची स्थापना करणे आहे.

 

आगामी काही महिन्यात मुंबई महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. त्याचबरोबर याच वर्षात कर्नाटक विधानसभा तस पुढील वर्षी लोकसभा निवडणुका होणार आहेत. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकाही होणार आहेत. त्यामुळे सत्ताधारी बीजेपी आणि त्यांचे मित्र पक्ष व संघटना राज्यात मुस्लिमांविरुद्ध हिंदू मतदारांचे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न करत आहेत. जेणेकरून याचा फायदा निवडणुकीत होऊ शकेल.

IPL_Entry_Point

विभाग