मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Vinayak Mete Death : विनायक मेटे यांचे चालक एकनाथ कदम पोलिसांच्या ताब्यात

Vinayak Mete Death : विनायक मेटे यांचे चालक एकनाथ कदम पोलिसांच्या ताब्यात

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Aug 14, 2022 04:55 PM IST

विनायक मेटे यांच्या ड्रायव्हरला ताब्यात घेतल्यानंतर नवी मुंबई पोलीसांनी त्याची वैद्यकीय तपासणी केली. त्याला रसायनी पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे.

विनायक मेटे
विनायक मेटे

शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे (Vinayak Mete)  यांचे पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवर  अपघाती निधन झाले. मेटे यांच्या मृत्यूनंतर शिवसेना व मराठी क्रांती ठोक मोर्चाच्या नेत्यांनी हा अपघात की, घातपात अशी शंका उपस्थिती केली आहे. मराठा नेते संभाजीराजे छत्रपती यांनी मेटेंचा अपघाती मृत्यू म्हणजे केंद्र व राज्य सरकारचे अपयश असल्याचे टीका केली आहे. 

या गंभीर अपघातातून मेटे यांच्या गाडीचे चालक एकनाथ कदम सुदैवाने बचावले आहेत. त्यांना किरकोळ दुखापत झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. विनायक मेटे यांच्या ड्रायव्हरला ताब्यात घेतल्यानंतर नवी मुंबई पोलीसांनी त्याची वैद्यकीय तपासणी केली. त्याला रसायनी ( रायगड जिल्हा ) पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे. 

विनायक मेटे यांच्या गाडीचे चालक एकनाथ कदम यांचा जबाब पोलीस नोंदवणार आहेत. एकनाथ कदम यांची रसायनी पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. पोलीस चालकाकडून अपघाताचा तपशील पडताळून पाहणार आहेत. आता कदम यांना रसायनी पोलीस घेवून गेले आहेत. रसायनीमध्ये त्याची मेडिकल करण्यात येणार आहे. विनायक मेटे यांचा अपघात झाला त्या ठिकाणच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे पोलीस तपासणार आहेत. गाडीला अपघात होण्याच्या आधीची वेळ आणि अपघाता नंतरची वेळ तपासली जाणार आहेत. 

IPL_Entry_Point