मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Uddhav Thackeray : वीर सावरकर आमचं दैवत, त्यांचा अपमान सहन करणार नाही, उद्धव ठाकरेंनी ठणकावलं
उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : वीर सावरकर आमचं दैवत, त्यांचा अपमान सहन करणार नाही, उद्धव ठाकरेंनी ठणकावलं

26 March 2023, 20:44 ISTShrikant Ashok Londhe

Uddhav Thackeray speech in malegoan : स्वातंत्र्यवीर सावरकर हे आमचे दैवत आहे, आम्ही आमच्या देवतांचा अपमान सहन करणार नाही, असा स्पष्ट संदेश उद्धव ठाकरेंनी राहुल गांधी यांना दिला आहे.

Uddhav Thackeray In Malegoan : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मालेगावात सभा घेतली. सत्तासंघर्षानंतर ठाकरे पहिल्यांदाच मालेगावात सभा घेतली. या शिवगर्जना मेळाव्यातून ठाकरे यांनी शिंदे गटातील सुहास कांदेंचा समाचार घेतला. एमएसजी महाविद्यालयाच्या मैदानावर ही सभा पार पडली. ठाकरेंच्या सभेसाठी कार्यकर्त्यांची  मोठी गर्दी जमली होती. यावेळी उद्धव यांनी राहुल गांधी यांनाही ठणकावलं. 

ट्रेंडिंग न्यूज

उद्धव ठाकरे म्हणाले की, ही लढाई लोकशीहीची लढाई आहे. कन्याकुमारीपासून कश्मीरपर्यंत आम्ही राहुल गांधी यांच्यासोबत होतो. स्वातंत्र्यवीर सावरकर हे आमचे दैवत आहे, आम्ही आमच्या देवतांचा अपमान सहन करणार नाही. स्वातंत्र्यवीरांनी १५ व्य़ा वर्षी स्वातंत्र्यांची शपथ घेतली होती. आपण लोकशाहीसाठी एकत्र आलो आहोत. त्यामुळे आता यात वेगळे फाटे फोडू नका, असे राहुल यांना सांगत आहोत. अंदमानमध्ये त्यांनी १४ वर्षे मरण यातना सोसल्या आहेत. ते येरागबाळ्याचे काम नाही, असे उद्धव म्हणाले.

सुहास कांदे  यांचं नाव न घेता उद्धव ठाकरे यांनी तुफान टोलेबाजी केली. एका कांद्याला खोक्यांचा भाव मिळत असेल तर कांदे उत्पादक शेतकऱ्यांना किती मिळाले पाहिजेत, असे म्हणत त्यांना शिंदे गटातील आमदार सुहास कांदे यांचा समाचार घेतला. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांना देखील टोले लगावले. शिवधनुष्य गद्दारांना अधिक काळ पेलणार नाही, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. 

शिंदे गटावर टीका करताना उद्धव म्हणाले की, तुम्ही काय मिळवले, माझ्यावरती व शिवसेनेवर प्रेम करणारा एकही माणूस तुम्ही बरोबर नेऊ शकला नाही. याउलट तुम्ही तुमच्या कपाळावर गद्दार असा कायमस्वरुपी शिक्का मारून घेतला. हा शिक्का आयुष्यभर तुमच्या कपाळावर राहणार आहे. निवडणूक आयोगाचे गांडूळ झाले आहे. आयोगाला मोतीबिंदू झालेला नसेल, तर त्यांनी आधी खेडची आणि आता मालेगावची सभा पाहावी. आयोगाने जे-जे मागितलं, ते सगळं दिलं. तरीदेखील त्यांनी आपल्यावर अन्याय केला. ही शिवसेना होय मी याला शिवसेनाच म्हणणार कारण ही माझ्या वडिलांनी स्थापन केली आहे. मिंध्याच्या वडिलांनी नाही. ज्यांना स्वतःच्या वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते, त्यांना बोलण्याचा अधिकार नाही.