मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Uddhav Thackeray: अनाथांच्या नाथा, भगवा, पाकिस्तान, हिंदुत्व, मोदींची मिमिक्री,उद्धव ठाकरेंच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे

Uddhav Thackeray: अनाथांच्या नाथा, भगवा, पाकिस्तान, हिंदुत्व, मोदींची मिमिक्री,उद्धव ठाकरेंच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Apr 23, 2023 10:14 PM IST

Uddhav Thackeray : जळगावातील पाचोऱ्यातून उद्धव ठाकरेंनी मोदी, शिंदे व भाजपसह निवडणूक आयोगावर सडकून टीका केली. फकीर झोळी लटकवून निघून जाईल व जनतेच्या हाती कटोरा देईल असे टोला मोदींचे नाव न घेता लगावला.

Uddhav Thackeray
Uddhav Thackeray

Uddhav Thackeray speech : जळगावातील पाचोऱ्यातून उद्धव ठाकरेंनी मोदी, शिंदे व भाजपसह निवडणूक आयोगावर सडकून टीका केली.  'अनाथांच्या नाथा झाल्या असतील तुमच्या वाऱ्या तर या आमच्या बांधावरती' अशी कविता सादर करत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे गटावर टीका केली. उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. देशात सध्याची परिस्थिती महागाई आणि बेरोजगारी या मुद्द्यांवरून उद्धव ठाकरेंनी मोदींवर निशाणा साधला आहे.

ठाकरेंच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे –

  • ४० गद्दार गेले तरी फरक पडणार नाही. यांना जसे घोड्यावर चढविले तसे खाली खेचण्याची वेळ आलीय. निवडणूक आयोगाला मोतीबिंदू झालाय, त्यांना ही गर्दी दिसणार नाही. पाकिस्तानला विचारा तेही शिवसेना कोणाची ते सांगतील. लवकरच निवडणुका लागतील. या गद्दाराला गाडायचे आहे. 
  • भाजपाला माझे जाहीर आव्हान आहे. मिंधेंच्या नेतृत्वाखाली भाजपा महाराष्ट्रातील निवडणुका लढणार आहे का, बावनकुळेंनी सांगावे त्या ४८ जागा देणार का, आणखी एक आव्हान देतो. आमचे चोरलेले शिवधनुष्य घेऊन या, होऊन जाऊद्या. महाराष्ट्र हा गद्दारांचा नाही.
  • भाजपा आव्हान अजिबात नाहीय, परंतू जोवर भाजपा राज्यात आणि देशात सत्तेवर असेल तोवर ते जे राज्याचे नुकसान करतील ते कसे भरून काढायचे हे माझ्यासमोर आव्हान आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. 
  • काही जणांना वाटतं की ते म्हणजे शिवसेना, अरे हाट...यांना जसं घोड्यावर चढवलं होतं, तसं खाली खेचण्याची वेळ आली आहे. निवडून दिलेले गद्दार झाले, पण निवडून देणारे आजही माझ्यासोबत आहेत. ज्यांनी आपल्या निष्ठेला, भगव्याला कलंक लावला, तो कलंक लावणारे हात आपल्याला काढून टाकायचे आहेत.
  • मी काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत गेलो तर म्हणे हिंदुत्व सोडले. मविआला तीन वर्षे झाली. कधी हिंदुत्व सोडले हे दाखवून द्या, मी आता हे व्यासपीठ सोडून जाईन, असं ओपन चॅलेंज उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे. 
  • मोदी पूर्वी म्हणायचे, महागाई कमी झाली की नाही झाली...पेट्रोलचे भाव कमी झाले की नाही झाले...आता 'अब की बार' बस झालं. यांना 'आपटी बार' दाखवावाच लागेल, 
  • सत्यपाल मलिक म्हणाले तसं, यांनी निवडणुकीसाठी जवान मारले असतील, तर अशा लोकांसाठी आपण आपले सुपूत्र यांच्यावर ओपाळून टाकायचे का? यांना किती दिवस चालवून घेणार? या भगव्यावर त्या चोरांचा अधिकार नाही. खंडोजी खोपडेच्या हातात भगवा शोधून दिसत नाही. यांना स्वतःच काही नाही, दुसऱ्यांच चोरावं लागतं, अशी जहरी टीका त्यांनी यावेळी केली. 
  • हे उलट्या पायाचं सरकार हे स्वत:च एक संकट आहे. अवकाळी आलेलं सरकार आहे. गारपीट काय होतेय, अवकाळी पाऊस काय पडतोय. एका तरी संकटात यांनी केलेली मदत तुमच्यापर्यंत पोहचली का? 
  • उद्धव ठाकरे म्हणाले की, आज भाजपकडून गाईला जेवढी सुरक्षा दिली जाते, तेवढी सुरक्षा इथल्या आईला दिली जात नाही. भाजपच्या राज्यात महिला सुरक्षित नाहीत. ठाण्यातील रोषणी शिंदे यांना मारहाण करण्यात आली. ती हात जोडून कळवळत असतानाही तिच्या पोटात मारलं गेलं. पण तिची तक्रार नोंदवून न घेता, उलट तिच्यावरच गुन्हा दाखल करण्यात आला.

IPL_Entry_Point