मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Uddhav Thackeray : दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार; तयारीला लागा, उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश

Uddhav Thackeray : दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार; तयारीला लागा, उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Sep 17, 2022 03:52 PM IST

शिवसेनेचा दसरा मेळावा (Shivsena Dasara Melava 2022) शिवतीर्थवर होणार की नाही, याबाबत संभ्रम असताना उद्धव ठाकरे (UddhavThackeray) म्हणाले की, यंदाचा दसरा मेळावा हा शिवतीर्थावरच होणार आहे. त्याबद्दल कोणताही संभ्रम मनात ठेवू नका. त्यासाठी मुंबई महापालिकेमध्ये रिमांइंडर अर्जही देण्यात आला आहे.

उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे

मुंबई-शिवसेनेतून ४० आमदारांनी वेगळा गट स्थापन केल्यानंतर खरी शिवसेना कुणाची हा प्रश्न निर्माण झाला आहे. हा प्रश्न सध्या न्यायप्रविष्ट असताना शिवसेनेचा परंपरागत दसरा मेळावा (Shivsena Dasara Melava 2022) कोण घेणार यावरून एकनाथ शिंदे गट व उद्धव ठाकरे गटामध्ये कमालीचा संघर्ष सुरू आहे. एकनाथ शिंदेही दसरा मेळावा घेण्यावर ठाम आहेत. त्यामुळे शिवतीर्थावर यंदा दसरा मेळाव्यास जागा मिळणार का? यावरून शंका-कुशंका उपस्थित होत असताना उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) यंदाचा दसरा मेळावाही शिवतीर्थावरच होणार असल्याची घोषणा करत पदाधिकाऱ्यांना तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत.

शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थवर होणार की नाही, याबाबत संभ्रम असताना तसेच ठाकरे व शिंदे गटावरून पर्यायी जागा म्हणून वांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्सची चाचपणी सुरू असताना उद्धव ठाकरे यांनी आजच्या पदाधिकारी बैठकीत यावर भाष्य केलं आहे. उद्धव ठाकरे म्हणाले की, यंदाचा दसरा मेळावा हा शिवतीर्थावरच होणार आहे. त्याबद्दल कोणताही संभ्रम मनात ठेवू नका. त्यासाठी मुंबई महापालिकेमध्ये रिमांइंडर अर्जही देण्यात आला आहे. शिवसेनेचा २१ तारखेला पदाधिकारी मेळावा होणार आहे. त्यासाठीही शाखा स्तरावर बैठका घेण्याचे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.

दोन महिन्यात वेदांता प्रकल्प गुजरातला गेलाच कसा?

फॉक्सकॅान प्रकल्प राज्याबाहेर गेल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातमध्ये जात असताना सध्याचं राज्य सरकार काय करत होतं असा सवालउद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. शिवसेना भवनमध्ये पार पडलेल्या पदाधिकारी बैठकीत उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे

उद्धव ठाकरे म्हणाले की, गुजरात महाराष्ट्राचा लहान भाऊ आहे. मात्र महाराष्ट्रातील एक मोठा प्रकल्प गुजरातला जात असताना राज्य सरकार काय करत होते. दोन महिन्यात फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेलाच कसा? असा सवाल करत वेदांता आणि फॉक्सकॅान सारख्या कंपन्या राज्याबाहेर जाणे राज्यासाठी नुकसानकारक असल्याचे ठाकरे म्हणाले.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या