Nandurbar Accident : शहादामध्ये ट्रॅव्हल्स व आयशरच्या धडकेत तीन जण ठार, १७ जण जखमी
नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा शहरात खासगी ट्रॅव्हल्स बस आणि आयशर टेम्पो यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात तीन जण जागीच ठार झाले.
नंदुरबार -नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा शहरात खासगी ट्रॅव्हल्स बस आणि आयशर टेम्पो यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली. हा भीषण अपघात शहताली बायपास रस्त्यावर नवीन बसस्थानकावर झाला. अपघातात तीन जण ठार तर ट्रॅव्हल्समधील १७ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
ट्रेंडिंग न्यूज
आयशरमधील ऊसतोडणी मजूर ऊसतोडणीसाठी सांगली जिल्ह्याकडे जात असल्याची माहिती घटनास्थळावरून मिळाली आहे. तर खासगी ट्रॅव्हल्समध्ये देखील मजूर हे मजुरीसाठी गुजरात कडे जात होते. घटनेची माहिती मिळताच शहादा पोलीसाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून तातडीने मदतकार्य सुरु करण्यात आले आहे.
अपघातानंतर रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. अपघातस्थळाचे दृष्य खूपच भीषण होते. मजुरांचे साहित्य रस्त्यावर विखुरले होते.
संबंधित बातम्या
विभाग