मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  IPS Officers Transfer: राज्यातील २४ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुणे ग्रामीण अधीक्षकपदी अंकित गोयल

IPS Officers Transfer: राज्यातील २४ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुणे ग्रामीण अधीक्षकपदी अंकित गोयल

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Oct 20, 2022 11:54 PM IST

IPS Officers Transfer : शिंदे-फडणवीस सरकारने राज्यातील तब्बल २४ पोलीस अधिकाऱ्यांच्या तडका फडकी बदल्या केल्या आहेत. यामध्ये पोलीस उपायुक्त तसेच पोलीस अधीक्षकांचा समावेश आहे.

पुणे ग्रामीण अधीक्षकपदी अंकित गोयल
पुणे ग्रामीण अधीक्षकपदी अंकित गोयल

मुंबई/पुणे -  पुणे ग्रामीण पोलिस दलाच्या अधीक्षकपदी अंकित गोयल (Ankit Goyal) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य सरकारने गुरुवारी (२० ऑक्टोबर) रात्री २४ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले. गोयल यापूर्वी गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक होते. दरम्यान, डॉ. अभिनव देशमुख (Abhinav Deshmukh’s transfer)  यांच्या बदलीचे स्वतंत्रपणे आदेश काढण्यात येणार आहेत.

पोलीस अधीक्षक असताना गडचिरोलीतील ग्रामीण भागात राबविलेल्या विविध उपक्रमांमुळे अंकित गोयल चर्चेत आले होते. त्यांची नियुक्ती आता पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षकपदी करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुका आणि जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था कायम ठेवण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे.

राज्यातील २४ पोलीस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या -

शिंदे-फडणवीस सरकारने राज्यातील तब्बल २४ पोलीस अधिकाऱ्यांच्या तडका फडकी बदल्या केल्या आहेत. यामध्ये पोलीस उपायुक्त तसेच पोलीस अधीक्षकांचा समावेश आहे.

मुंबई, ठाणे, पुणे, नागपूरसह राज्यातील अनेक शहरातील पोलीस अधिकाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे. गेल्या काही दिवसांपासून पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार अशा चर्चा सुरु होत्या. अखेर आज पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा शासन निर्णय गृह विभागाकडून जारी करण्यात आला आहे.

खालील अधिकाऱ्याच्या बदल्यांचे आदेश जारी -

  • श्रीकृ्ष्ण कोकाटे : पोलीस उप आयुक्त बृहन्मुंबई- पोलीस अधीक्षक, नांदेड
  • सोमय विनायक मुंडे : अपर पोलीस अधीक्षक, गडचिरोली - पोलीस अधीक्षक- लातूर
  • सारंग डी आवाड : पोलीस उप आयुक्त, नागपूर शहर- पोलीस अधीक्षक, बुलढाणा
  • गौरव सिंह : पोलीस अधीक्षक, महाराष्ट्र पोलीस अकादमी, नाशिक- पोलीस अधीक्षक, यवतमाळ
  • संदीप घुगे : समादेशक, राज्य राखीव पोलीस बल, गट क्रमांक ११ नवी मुंबई - पोलीस अधीक्षक, अकोला
  • रवींद्रसिंग एस. परदेशी : उप आयुक्त राज्य गुप्त वार्ता विभाग, मुंबई- पोलीस अधीक्षक, चंद्रपूर
  • नुरुल हसन : पोलीस उप आयुक्त, नागपूर शहर- पोलीस अधीक्षक, वर्धा
  • निखील पिंगळे : पोलीस अधीक्षक, लातूर- पोलीस अधीक्षक, गोंदिया
  • निलोत्पल : पोलीस उप आयुक्त बृहन्मुंबई- पोलीस अधीक्षक, गडचिरोली
  • संजय ए बारकुंड : पोलीस उप आयुक्त, नाशिक शहर- पोलीस अधीक्षक, धुळे
  • श्रीकांत परोपकारी : प्राचार्य, पोलीस प्रशिक्षण केंद्र, नागपूर- पोलीस उप आयुक्त, ठाणे शहर
  • सचिन अशोक पाटील : पोलीस अधीक्षक, नाशिक ग्रामीण- पोलीस अधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, औरंगाबाद
  • लक्ष्मीकांत पाटील : पोलीस उप आयुक्त, ठाणे शहर- प्राचार्य, पोलीस प्रशिक्षण केंद्र, नागपूर
  • पराग शाम मणेरे : पदस्थापनेच्या प्रतीक्षेत- उप आयुक्त विशेष सुरक्षा विभाग (व्हीआयपी सुरक्षा) मुंबई
  • धनंजय आर कुलकर्णी : पदस्थापनेच्या प्रतीक्षेत - पोलीस अधीक्षक, रत्नागिरी
  • पवन बनसोड : अपर पोलीस अधीक्षक औरंगाबाद ग्रा- पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग
  • बसवराज तेली : पोलीस उप आयुक्त नागपूर शहर- पोलीस अधीक्षक,सांगली
  • शेख समीर अस्लम : अपर पोलीस अधीक्षक गडचिरोली- पोलीस अधीक्षक, सातारा
  • अंकित गोयल : पोलीस अधीक्षक, गडचिरोली- पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण
  • शिरीष एल सरदेशपांडे : पोलीस अधीक्षक, महाराष्ट्र पोलीस अकादमी नाशिक- पोलीस अधीक्षक ,सोलापूर ग्रामीण
  • राकेश ओला : पोलीस अधीक्षक, लाचलुतपत प्रतिबंधक विभाग, नागपूर- पोलीस अधीक्षक, अहमदनगर
  • एम. राजकुमार : पोलीस अधीक्षक लोहमार्ग, नागपूर- पोलीस अधीक्षक, जळगाव
  • रागसुधा आर. : समादेशक , राज्य राखीव पोलीस बल, गट क्रमांक ३ जालना- पोलीस अधीक्षक, परभणी
  • संदीप सिंह गिल : समादेशक राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक १२ हिंगोली - पोलीस अधीक्षक, हिंगोली

IPL_Entry_Point