मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra High Alert: मुंबईसह समुद्र किनारपट्टीच्या जिल्ह्यांत नाकाबंदी, संपूर्ण राज्यात हाय अलर्ट

Maharashtra High Alert: मुंबईसह समुद्र किनारपट्टीच्या जिल्ह्यांत नाकाबंदी, संपूर्ण राज्यात हाय अलर्ट

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Aug 18, 2022 04:46 PM IST

Maharashtra High Alert : रायगडमध्ये शस्त्रास्त्रे सापडल्यानंतरमुंबई-पुण्यासह समुद्रकिनारपट्टीच्या जिल्ह्यांमध्येनाकाबंदी करण्यात आली आहे. पालघरच्या किनारपट्टी भागातही पोलिसांकडून नाकाबंदी करण्यात आलीआहे. तसेच संपूर्ण राज्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

संपूर्ण राज्यात हाय अलर्ट
संपूर्ण राज्यात हाय अलर्ट

Maharashtra High Alert : रायगड जिल्ह्यातील  श्रीवर्धन येथे आढळलेल्या संशयास्पद बोटीत एके-४७ रायफल आणि २२५ राउंड्स गोळ्या आढळल्याने खळबळ माजली आहे. त्याबरोबरच हरिहरेश्वर येथेही एक लहान बोट आढळून आली, त्यामध्ये लाइफजॅकेट व इतर साहित्य मिळाले आहे. यानंतर पोलीस प्रशासन सतर्क झाले असून राज्यात हाय अलर्ट (High Alrt) जारी करण्यात आला आहे. 

रायगडमध्ये शस्त्रास्त्रे सापडल्यानंतर मुंबई-पुण्यासह समुद्रकिनारपट्टीच्या जिल्ह्यांमध्ये नाकाबंदी करण्यात आली आहे. पालघरच्या किनारपट्टी भागातही पोलिसांकडून नाकाबंदी करण्यात आली आहे. पोलिसांनी रायगडमध्ये आज सापडलेल्या दोन संशयास्पद बोटी जप्त केल्या आहेत. या बोटींमध्ये शस्त्रसाठा सापडल्याने राज्यभरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्यातील सर्व किनारी भाग व संवेदनशील भागात हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. 

रायगडमध्ये सापडलेल्या एके ४७ प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली. सुरक्षेच्या कारणास्तव किनारी भागांसह राज्यभरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. या प्रकरणाची सर्व माहिती राज्य सरकारकडून केंद्रीय एजन्सींना देण्यात येत आहे

मुंबईमध्ये नाकाबंदी करण्यात आली आहे. तसेच राज्यभरात हायअलर्ट जारी कऱण्यात आला आहे. तसेच इतर राज्यांनाही याबाबत माहिती देण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एटीएस प्रमुख विनीत अग्रवाल रायगडला रवाना झाले आहेत. 

IPL_Entry_Point