मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  बागेश्वर बाबाचे तुकोबारायांबद्दल आक्षेपार्ह विधान! सुप्रिया सुळे, रोहित पवारांची संतप्त प्रतिक्रिया

बागेश्वर बाबाचे तुकोबारायांबद्दल आक्षेपार्ह विधान! सुप्रिया सुळे, रोहित पवारांची संतप्त प्रतिक्रिया

Jan 29, 2023 06:51 PM IST

Dhirendra krishna maharaj : बागेश्वरधामचे महाराज धीरेंद्र कृष्ण महाराज यांनी संत तुकाराम महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याने महाराष्ट्रातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे व रोहित पवार यांनीही यावर संताप व्यक्त केला आहे.

Dhirendra krishna maharaj
Dhirendra krishna maharaj

बागेश्वर धामचे महाराज धीरेंद्र कृष्ण शास्त्री गेल्या काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत आहेत.त्यांनी चमत्कार करून दाखवावा व ३० लाख रुपये मिळवावे असे आव्हान अंधश्रद्धा निर्मूलन संस्थेने दिले होते. मात्र त्यानंतर नागपुरातील रामकथा संपवून परत रायपूरला गेलेले धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी आता राष्ट्रसंत तुकाराम महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान केले आहे. संत तुकाराम महाराजांच्या पत्नी त्यांना रोज मारहाण करायच्या, असे वादग्रस्त विधान धीरेंद्र शास्त्री यांनी केले आहे. त्यांच्या याच विधानानंतर महाराष्ट्रात संताप व्यक्त केला जात आहे. वारकारी संप्रदाय व भाजपच्या आध्यात्मिक आघाडीने या वक्तव्याचा निषेध केला आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेव आमदार रोहित पवार यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, धीरेंद्र महाराजांच्या विधानाचा जाहीर निषेध झाला पाहिजे. जे लोक असे बोलतात ते अर्थातच चुकीच आहे. मी अध्यात्माकडे वळलेले आहे. मी अध्यात्म करते म्हणजे माझ्या घरात वाईट आहे असे नाही. हे भारतीय संस्कार आहेत. हे संस्कार आपल्या मुलांवर करण्याचा आपण प्रयत्न करत असतो. तुकाराम महाराजांचा केला जात असेल तर एक समाज म्हणून आपण त्याचा निषेध केला पाहिजे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

 

ट्रेंडिंग न्यूज

रोहित पवार यांनी म्हटले की, बागेश्वर बाबाने तुकोबारांयांबद्दल गरळ ओकली असताना राज्याचे पालकत्व ज्यांच्याकडे आहे ते मात्र शांत आहेत. या बाबाची बडबड एकवेळ मध्य प्रदेशात खपेल पण भक्ती-प्रेमाची शिकवण देणाऱ्या संतांबाबत आणि वारकरी संप्रदायाबद्दल बोललेले महाराष्ट्र कदापि खपवून घेणार नाही. अशा माणसाला सरकारने तुकोबारा यांच्याच शब्दांत उत्तर द्यावे. तुका म्हणे ऐशा नरा मोजूनी माराव्या पैजरा!, असे ट्विट रोहित पवार यांनी केले आहे.

काय म्हणाले होते धीरेंद्र कृष्ण शास्त्री?

धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा एक व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर चांगलाच व्हायरल होत आहे. त्यामध्ये ते संत तुकाराम महाराज यांची पत्नी त्यांना रोज मारहाण करायची, असा दावा धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी केला आहे. संत तुकाराम महाराज महाराष्ट्रातील एक महात्मा आहेत. त्यांची पत्नी त्यांना रोज मारहाण करायची. याच कारणामुळे त्यांना एका व्यक्तीने विचारले की तुमची पत्नी तुम्हाला रोज मारहाण करते, मग तुम्हाला वाईट वाटत नाही का? या प्रश्नाचे संत तुकाराम महाराजांनी उत्तर दिले. ते म्हणाले की, देवाची कृपा आहे की मला मारहाण करणारी पत्नी भेटली. मला प्रेम करणारी पत्नी भेटली असती, तर मी देवाच्या प्रेमात पडलोच नसतो. मी पत्नीच्याच प्रेमात गुरफटून गेलो असतो. असे धीरेंद्र कृष्ण शास्त्री म्हणाले.

WhatsApp channel