मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  SSC Result 2023 : दहावीच्या परीक्षेत ९४,१९८ विद्यार्थी नापास, १५१ जणांना पैकीच्या पैकी गुण

SSC Result 2023 : दहावीच्या परीक्षेत ९४,१९८ विद्यार्थी नापास, १५१ जणांना पैकीच्या पैकी गुण

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Jun 02, 2023 12:54 PM IST

Maharashtra SSC Result 2023 : राज्याचा दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी निकालाचा टक्का ३.११ टक्क्याने घटला आहे. राज्याच्या निकाल ९३.८३ टक्के लागला आहे. एकूण विद्यार्थ्यांपैकी ९४,१९८ विद्यार्थी नापास झाले आहे, तर १५१ विद्यार्थ्यांनी पैकीच्या पैकी गुण मिळवले आहे.

 10th Result
10th Result

Maharashtra SSC Result 2023 : राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे. राज्याच्या निकाल ९३.८३ टक्के लागला असला तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत यात ३.११ टक्क्यांनी घट झाली आहे. या वर्षी सर्व विभागातून १५,२९.०९६ विद्यार्थी बसले होते. यातील १४,३४,८९८ विद्यार्थी हे उत्तीर्ण झाले तर ९४,१९८ विद्यार्थी नापास झाले आहेत. उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी १५१ विद्यार्थ्यांनी पैकीच्या पैकी गुण विद्यार्थी मिळवले आहेत.

SSC Result : दहावीचा निकाल जाहीर; ९३.८३ टक्के विद्यार्थी पास, मुलींनी पुन्हा मारली बाजी

बारावीच्या निकालानंतर १० वीच्या निकालाची प्रतीक्षा सर्वांना होती. हा निकाल कधी लागेल याची उत्सुकता सर्वांना होती. आज बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषद घेत हा निकाल जाहीर केला. यात दहावीच्या निकालाची टक्केवारी ही गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत घडली आहे. २०२० मध्ये दहावीचा निकाल ९५.३०, २०२१ मध्ये ९९.९५, तर २०२२ मध्ये ९६.९४ टक्के निकाल लागला होता. मात्र, यावर्षी राज्याचा निकाल हा ९३.८३ टक्के लागला. यात ३.११ टक्क्यांची घट झाली आहे. या वर्षी दिव्यांगाच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९२.९४ टक्के आहे.

Raj Thackeray : मराठी जनांनी 'ही' शपथ घ्यावी; शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्तानं राज ठाकरे यांचं आवाहन

या वर्षी सर्व विभागातून १५,२९.०९६ विद्यार्थी बसले होते. यातील १४,३४,८९८ विद्यार्थी हे उत्तीर्ण झाले तर ९४,१९८ विद्यार्थी नापास झाले आहेत. उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी १५१ विद्यार्थ्यांनी पैकीच्या पैकी गुण विद्यार्थी मिळवले आहेत. यात औरंगाबादचे सर्वाधिक विद्यार्थी आहेत.

बारावी प्रमाणे दहावीच्या निकालातही मुलींनी बाजी मारली आहे. यावर्षी ९५.८७ टक्के मुली पास झाल्या आहेत. तर ९२.५ टक्के मुले पास झाले आहेत. मुलांपेक्षा मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ३.८२ टक्क्यांनी जास्त आहे. राज्यातील ५,२६.१२० विद्यार्थ्यी प्रथम श्रेणीत तर ३ ,३४,०५१ विद्यार्थी हे द्वितीय श्रेणीत तर ८५२१८ विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.

 

यंदा दहावीच्या परीक्षेला २३ हजार १० शाळांमधील १५ लाख ७९ हजार ३७४ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. परंतु मागील पाच वर्षाच्या तुलनेत यंदा परीक्षेसाठी नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा विद्यार्थ्यांची नोंदणी ६१ हजार ७०८ ने कमी झाली आहे.

कोकण विभाग अव्वल

यावर्षी कोकण विभागाचा दहावीचा निकाल ९८. ११ टक्के लागला आहे. हा विभाग राज्यात अव्वल आला आहे. तर नागपूर विभागाचा निकाल ९२.०५ टक्के लागला असून हा निकाल सर्वात कमी आहे. या वर्षीच्या निकालात पुनरपरिक्षार्थींचे उत्तीर्णतेचे प्रणाम हे ६०.९० टक्के आहे. खाजगी विद्यार्थ्यांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ७४.२५ टक्के आहे. यावर्षी दिव्यांगाच्या उत्तीर्णतेचे प्रमाण देखील चांगले आहेट. तब्बल ९२.४९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. १४ जूनला विद्यार्थ्यांना गुणपत्रिका शाळेत उपलब्ध होतील, अशी माहीत बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली.

विभागवार निकाल

पुणे ९५.६४, नागपूर ९२.०५, औरंगाबाद ९३.२३, मुंबई ९३.६६, कोल्हापूर ९६.७३,अमरावती ९३.२२, नाशिक ९२.२२, लातूर ९२.६७, कोकण ९८.११ विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने हा निकाल पाहता येणार आहे. खालील अधिकृत संकेतस्थळावर हा निकाल जाहीर केला जाणार आहे.

IPL_Entry_Point

विभाग