मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  विठ्ठला, कोणता झेंडा घेऊ हाती?; दीपाली सय्यद संभ्रमात
दीपाली सय्यद
दीपाली सय्यद

विठ्ठला, कोणता झेंडा घेऊ हाती?; दीपाली सय्यद संभ्रमात

23 June 2022, 16:18 ISTNinad Vijayrao Deshmukh

दीपाली सय्यद यांना एकथान शिंदे यांनी शिवसेनेत आणले. आज त्यांनीच शिवसेनेविरोधात बंद केले आहे. अनेक नाराज आमदार त्यांच्या सोबत असल्याने दिपाली सय्यद यांनी व्टिट करत त्यांच्या मनातील दुविधा व्यक्त केली.

Maharashtra Political crisis राज्यात एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीमुळे राजकाराणाला कलाटणी मिळाली आहे. नाराजांचा मोठा गट घेऊन शिंदे हे गुवाहाटीला गेले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार संकटात आले आहे. दरम्यान काल या सर्व प्रकारामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगला सोडला. तसेच आमदारांना पुन्हा येण्याची भावनिक सादही घातली. यानंतर शिवसेनेच्या नेत्या असलेल्या दिपाली सय्यद यांनीही त्यांची भूमिका व्यक्त केली. त्यांना शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी आणले. मात्र, त्यांनीच बंड केले. त्यांच्या सोबत अनेक आमदार जात असतांना ‘विठ्ठला सांगा मी कोणता झेंडा घेऊ’ अशी दुविधा व्यक्त केली.

ट्रेंडिंग न्यूज


दिपाली सय्यद यांनी व्टिट केले की, ‘सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब मला शिवसेनेत घेऊन आले. माननीय उद्धवसाहेब ठाकरे साहेबांनी मला शिवसेनेत वावरायला शिकवले. दोन्ही बाजु गुरूचरणी, विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती? आमची निष्ठा प्रतिष्ठा शिवसेनेच्या चरणी, भविष्यात जे होईल त्याचा स्वीकार करू, असे दिपाली सय्यद यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.


दरम्यान राज्यात राजकीय घडमोडींना वेग आला आहे. बंडाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘मी अयोग्य आहे, हे बंडखोर आमदारांनी समोर येऊन सांगावं, मी लगेचच राजीनामा देईन,’ जर मुख्यमंत्री शिवसेनेचा होणार असेल तर आनंदानी सत्ता सोडेल असेही ते म्हणाले. मात्र, एकनाथ शिंदे यांनी व्टीट करत त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. तयांनी उद्धव ठाकरे यांची मागणी फेटाळून लावली आहे.

  • Share on Twitter
  • Share on FaceBook

विभाग