मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  ‘खेड तालुक्यात बंडाळी झाली तेव्हा कुणी निषेध नव्हता केला’; खासदार आढळराव पाटील यांचा घरचा आहेर
शिवाजीराव आढळराव पाटील
शिवाजीराव आढळराव पाटील
27 June 2022, 18:48 ISTNinad Vijayrao Deshmukh
  • Share on Twitter
  • Share on FaceBook
27 June 2022, 18:48 IST
  • एकनाथ शिंदे यांच्या बंडाळी विरोधात शिवसैनिक रस्त्यावर उतरला आहे. मोठ्या प्रमाणात निषेध केला जात आहे. मात्र, दिड वर्षांपूर्वी खेड तालुक्यातही बंडाळी झाली होती. तेव्हा मात्र, कुठल्यास शिवसैनिकाने अध्यवा पक्षातून याचा निषेध करण्यात आला नव्हता, असा घरचा आहेर माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पक्षाला दिला आहे.

Maharashtra political crisis  एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीमुळे शिवसेनेतील नाराजी चव्हाट्यावर आली आहे. अनेक मंत्री पक्षाला सोडून शिंदे गटात सामिल झाले आहे. त्यात आता पुण्यातील शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनीही पक्षाला घराचा आहेर दिला आहे. खेड तालुक्यात पंचायत समितीच्या राजकारणात जेव्हा बंडाळी झाली होती. तेव्हा कुठलाच शिवसैनिक अथवा पक्षातील नेत्याने राष्ट्रवादीच्या आमदारा विरोधात आवाज नव्हता उठवला, असे आढळराव पाटील यांनी म्हटले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

चाकण येथे एका कार्यक्रमात बोलतांना शिवाजी आढळराव पाटील यांनी वरील खंत व्यक्त केली. आढळराव पाटील म्हणाले, शिवसेनेत आता बंडाळी झाली आहे. पण, अशीच बंडाळी ही दिड वर्षांपूर्वी झाली होती. खेड तालुक्यात झालेल्या बंडाळीची दखल पक्षातील कुणीच घेतली नव्हती.

दिड वर्षांपूर्वी खेड तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक आमदारांनी पक्षाला त्रास दिला. याच मुद्यावरून पाटील यांनी या बंडाळीची आठवण करुन पक्षाला घरचा आहेर दिला. खेड पंचायत समितीचे काम शिवसेनेमुळे झाले. मात्र, त्याचे श्रेय मिळू नये यासाठी राष्ट्रवादीच्या आमदारांनी केलेला खटाटोप हा शिवसेनेच्या -हासाचे कारण असल्याचा घाणाघातही त्यांनी केला.

विधान परिषदेच्या निवडणूकीच्या वेळीही हे आमदार शिवसेनेच्या उमेदवारांना मतदान करण्यास टाळाटाळ करत होते. मात्र, नेते विनवणी करत होते. त्यामुळे यांनी मदतदान केले. आता आमच्या विरोधात खेड पंचायत समितीत राजकारण हे आमदार करत असल्याची टीकाही त्यांनी केली.