मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  पालघरमध्ये महाविकास आघाडीला धक्का.. जिल्हा परिषदेत सत्तांतर, शिंदे गट व भाजप युतीची सत्ता

पालघरमध्ये महाविकास आघाडीला धक्का.. जिल्हा परिषदेत सत्तांतर, शिंदे गट व भाजप युतीची सत्ता

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Nov 16, 2022 04:47 PM IST

पालघर जिल्हा परिषदेतील महाआघाडीची सत्ता संपुष्टात आली आहे. बाळासाहेबांची शिवसेना व भाजपने एकत्र येत येथे सत्ता मिळवली आहे. शिंदे गटाचा अध्यक्ष तर भाजपचा उपाध्यक्ष अशी बिनविरोध निवड केली.

पालघर जिल्हा परीषद
पालघर जिल्हा परीषद

पालघर जिल्हा परिषदेतील महाविकासआघाडीची सत्ता गेली असून येथे सत्तापरिवर्तन होऊन आता बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप युतीची सत्ता आली आहे. बाळासाहेबांची शिवसेना गटाचे प्रकाश निकम अध्यक्षपदी तर भाजपचे पंकज कोरे यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून शिंदे गटालामहाराष्ट्रातील पहिल्याच जिल्हा परिषदेत सत्ता व पहिला जि.प. अध्यक्ष मिळाला आहे.

जुन्या शिवसेनेच्या सर्व २० सदस्यांचा शिंदे गटात प्रवेश -


पालघर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवडणूक आज पार पडली. पालघर जिल्हा परिषद महाविकास आघाडीच्या ताब्यात होती. मात्र जुन्या शिवसेनेचे सर्वच्या सर्व २० सदस्य शिंदे गटात गेल्यामुळे पालघर जिल्हा परिषदेमध्ये उद्धव ठाकरे गटाचा एकही सदस्य उरला नाही. परिणामी बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपने एकत्र येत जिल्हा परिषदेत सत्ता परिवर्तन केलं.


पालघर जिल्हा परिषदेची सदस्यसंख्या ५७ असून बहुमताचा आकडा २९ आहे. जिल्हा परिषदेत शिंदे गटाचे २० आणि भाजपचे १३ असे मिळून ३३ सदस्यांनी एकत्र येऊन सत्ता स्थापन केली आहे. दरम्यान बहुमत नसल्याने महाविकास आघाडीकडून एकही अर्ज दाखल करण्यात आला नसल्याने अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध झाली.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या