मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  “मग कोणालाच आरक्षण देऊ नका”, ब्राह्मण संघटनांच्या मागणीवर शरद पवार म्हणाले..

“मग कोणालाच आरक्षण देऊ नका”, ब्राह्मण संघटनांच्या मागणीवर शरद पवार म्हणाले..

Shrikant Ashok Londhe HT Marathi
May 21, 2022 09:17 PM IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीपुण्यात ब्राह्मण संघटनांसोबत बैठक केल्यानंतर पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. या बैठकीत अनेक मुद्द्यावर चर्चा करण्यात आली. यावेळी आरक्षणाच्या मुद्द्यावरही चर्चा झाली.

शरद पवार
शरद पवार

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात ब्राह्मण संघटनांसोबत बैठक केल्यानंतर पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पवार म्हणाले की, दवे नावाच्या व्यक्तीने मला फोन करून भेटीसाठी वेळ मागितली होती. यानंतर आपण या बैठकीचे आयोजन केल्याची माहिती शरद पवार यांनी दिली. तसेच कुठल्याही जात-धर्माविरोधात वक्तव्य करू नये, अशा सूचना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना दिल्या असल्याचेही पवारांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Sharad Pawar) हे ब्राह्मण विरोधी राजकारण करीत असल्याचा आरोप त्यांच्यावर केला जातो. दरम्यान अनेक राष्ट्रवादी नेत्यांच्या वक्तव्यामुळे पक्षाची प्रतिमा ब्राह्मण विरोधी झाल्याचं चित्र दिसत होते. परिणामी शरद पवारांनी पुढाकार घेत ब्राम्हण संघटनांना चर्चेसाठी आमंत्रण दिलं होते. यादरम्यान २० ब्राह्मण संघटनांचे ६० प्रतिनिधी पवारांकडे चर्चेसाठी उपस्थित होते. यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर चर्चा केली.

ब्राह्मण समाजाला सन्मानाने जगता यायला हवं, ही प्रमुख मागणी आहे. राष्ट्रवादीचे अनेक नेते जातीवाचक बोलतात असं यावेळी पवारांना सांगण्यात आलं. यावर आम्ही त्यांना समज देऊ असं पवारांना सांगितले. ब्राह्मण समाजासाठी आर्थिक विकास महामंडळाची मागणी केली आहे.

पवारांनी ब्राह्मण समाजाचं वेगवेगळ्या क्षेत्रातल्या योगदान असल्याचं सांगून कौतुक केलं. पवारांचे दोन्ही गुरू ब्राह्मण असल्याचं त्यांनी सांगितलं. काही भाषणामुळे ब्राह्मण समाजामध्ये राग निर्माण झाला होता. समाज माध्यमांमध्ये चुकीचा विखारी प्रचार झाला. ही अस्वस्था दूर करणं हे नेत्याच काम म्हणून ही बैठक बोलावली.  तणाव दूर करण्यासाठी, संवाद होण्यासाठी ही बैठक बोलावली होती.

कुठल्याही जातीच्या धोरणाविरोधात बोलू नये असं पक्षात सांगितलंय. दुसरी मागणी अशी होती की, ग्रामीण भागातला वर्ग नागरी भागात येतो.  त्यामुळे नोकरीसाठी संधी मिळण्याची हमी हवी. राज्य आणि केंद्राची आकडेवारी मागवली होती. पण त्यात लोकसंख्येच्या प्रमाणत प्रतिनिधीत्व असल्याने आरक्षणाच सूत्र बसत नाही हे मी सांगितलं. ब्राम्हण संघटनांच्या प्रतिनिधींनी मागणी केली की, मग कुणालाच आरक्षण देऊ नका. सर्वांचे आरक्षण रद्द करा. त्यावर पवारांनी उत्तर दिले की, दलितांना, गरिबांना आरक्षण द्यावं लागेल. ते मागास आहेत जोपर्यंत ते प्रगती करत नाहीत तोपर्यंत ही चर्चा करता येणार नाही. हे मत मांडल्यावर त्यांनी माझं काही चूक आहे असं सांगितल नाही किंवा त्यांचं धोरण बदललं असं ही सांगितलं नाही. असे पवार म्हणाले. 

IPL_Entry_Point

विभाग