मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sharad pawar : राजीनामा नाट्यानंतर शरद पवार पंढरपुरात विठुराया चरणी, म्हणाले “माझ्या हृदयात फक्त..” VIDEO

Sharad pawar : राजीनामा नाट्यानंतर शरद पवार पंढरपुरात विठुराया चरणी, म्हणाले “माझ्या हृदयात फक्त..” VIDEO

Shrikant Ashok Londhe HT Marathi
May 07, 2023 07:02 PM IST

Sharad pawar in pandharpur : शरद पवार यांनी पंढरपूरमध्ये विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतलं आहे. शरद पवारांसोबत यावेळी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटीलही होते.

Sharad pawar in pandharpur
Sharad pawar in pandharpur

राजीनामास्त्रानंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडवून दिल्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वो शरद पवार यांनी आज पंढरपुरात जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेतले. मंदिरांमध्ये देवदर्शनाला सहजा न जाणारे शरद पवार आज पंढपुरात विठूरायाच्या दर्शनासाठी दाखल झाले. यापूर्वी २०१७ मध्ये शरद पवार यांनी विठूरायाचे दर्शन घेतले होते. विठूरायाच्या दर्शनानंतर माध्यमांशी बोलताना पवार म्हणाले की, माझ्या हृदयात फक्त विठ्ठलाचे स्थानआहे.

शरद पवार यांनी पंढरपूरमध्ये विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतलं आहे. शरद पवारांसोबत यावेळी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटीलही होते. राष्ट्रवादी काँग्रेसमधील मधल्या राजीनामा नाट्यानंतर शरद पवार पहिल्यांदाच दौऱ्यासाठी बाहेर पडले होते. शरद पवारांनी राजीनामा मागे घेतल्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. पवारांनी राजीनामा मागे घेतल्यानंतर आपल्या कामाची सुरूवात विठ्ठलाच्या दर्शनाने केली आहे.

 

विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना पवार म्हणाले की,मी स्वतःसाठी कधी काही मागत नाही, पण सध्याच्या सरकारमुळे गोरगरीब अडचणीत आले आहेत. शरद पवार हे पुरोगामीविचारांसाठी प्रसिद्ध आहेत. फुले, शाहू, आंबेडकरांचा आदर्श ठेवत त्यांनी राजकीय आयुष्यात मार्गक्रमण केले आहे. गेल्या एक-दोन वर्षातील त्यांचे दोन प्रसंगवगळता कधीही मंदिरात गेले नाहीत. शरद पवार यांनी गेल्यावर्षी करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेतले होते. काही दिवसांपूर्वीच पुण्यातील देहूत जाऊन तुकोबारायांच्या समाधीचे दर्शन घेतले होते.

शरद पवारांनी २ मे रोजीलोक माझे सांगाती या त्यांच्या राजकीय आत्मचरित्राच्या दुसऱ्या आवृत्तीच्या प्रकाशन कार्यक्रमात राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याचीघोषणा करत सर्वांना धक्का दिला. पवारांच्या या निर्णयामुळे कार्यकर्ते भावुक झाले व त्यांना राजीनामा मागे घेण्यासाठी आंदोलन सुरू केले. काही कार्यकर्त्यांनी उपोषणही केलं. पवारांनी अध्यक्षपदाच्या निर्णयासाठी नेमलेल्या समितीतील सदस्यांच्या व कार्यकर्त्यांच्या आग्रहानंतर शरद पवारांनी राजीनामा मागे घेत आपल्या राजकीय कामाला पुनश्च हरिओम केले आहे.

 

IPL_Entry_Point