मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sambhaji Raje : "अशा 'कले'ला नको रे बाबा संरक्षण’’, संभाजीराजेंचं गौतमीबाबत केलेल्या वक्तव्यावर घूमजाव

Sambhaji Raje : "अशा 'कले'ला नको रे बाबा संरक्षण’’, संभाजीराजेंचं गौतमीबाबत केलेल्या वक्तव्यावर घूमजाव

Shrikant Ashok Londhe HT Marathi
May 29, 2023 09:28 PM IST

Sambhaji raje Chhatrapati : महाराष्ट्राची संस्कृती बिघडवणाऱ्या अशा 'कले'ला नको रे बाबा संरक्षण, असे मला वाटते, असं संभाजीराजेंनी म्हटलं आहे.

संभाजीराजेंचं गौतमीबाबत केलेल्या वक्तव्यावर घूमजाव
संभाजीराजेंचं गौतमीबाबत केलेल्या वक्तव्यावर घूमजाव

लावणी डान्सर गौतमी पाटील हिला संरक्षण देण्याबाबत केलेल्या विधानाबाबत युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी स्पष्टीकरण दिले आहे. महिला कलाकाराला धमक्या देणे हे चुकीचं समजून मी कलाकारांना संरक्षण दिले पाहिजे, असे म्हटले होते. मात्र त्याचे नकारात्मक पडसाद उमटल्यावर आश्चर्याने या कलाकाराची "कला" मी बघितली. आता महाराष्ट्राची संस्कृती बिघडवणाऱ्या अशा'कले'ला नको रे बाबा संरक्षण, असं मला वाटतं, असे संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी महिलांना संरक्षण दिले. त्यामुळे महिलांना स्वातंत्र्य माहित झाले. या अर्थाने कलाकारांना संरक्षण मिळाले पाहिजे. मी या मताचा आहे, असे संभाजीराजे छत्रपती य़ांनी म्हटले होते. त्यानंतर त्यावर अनेक उलटसुलट प्रतिक्रिया उमटल्या होत्या. त्यानंतर आज संभाजीराजेंनी आपल्या विधानाबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.

संभाजीराजे म्हणाले की, काल एका पत्रकाराने एका महिलेचा "कलाकार" असा उल्लेख करत, तिला त्रास व धमक्या दिल्या जात आहेत म्हणत मला प्रतिक्रिया विचारली. मला त्या व्यक्तीची व तिच्या कलेची काहीही माहिती नव्हती. पण महिला कलाकाराला धमक्या येणे हे चुकीचे आहे, असे समजून मी कलाकारांना संरक्षण दिले पाहिजे. असे मी बोलून गेलो.

 

मात्र आज त्याचे नकारात्मक पडसाद उमटल्यावर आश्चर्याने या कलाकाराची "कला" मी बघितली. आता महाराष्ट्राची संस्कृती बिघडवणाऱ्या अशा'कले' ला नको रे बाबा संरक्षण, असे मला वाटते, असं संभाजीराजेंनी म्हटलं आहे.

 

IPL_Entry_Point