मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Satara road : सातारा - पुणे जुन्या कात्रज घाटात ३१ डिसेंबरपर्यंत एकेरी वाहतूक; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Pune Satara road : सातारा - पुणे जुन्या कात्रज घाटात ३१ डिसेंबरपर्यंत एकेरी वाहतूक; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Dec 06, 2022 09:32 AM IST

Pune Satara road one way traffic : कात्रज शिंदेवाडी रस्ता राज्य मार्ग क्र. १२६ (जुना कात्रज घाट) च्या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम करण्यात येणार असल्याने या घाटातून ३१ डिसेंबर पर्यन्त एकेरी वाहतूक सुरू राहणार आहे.

सातारा - पुणे जुन्या कात्रज घाटात ३१ डिसेंबरपर्यंत एकेरी वाहतूक
सातारा - पुणे जुन्या कात्रज घाटात ३१ डिसेंबरपर्यंत एकेरी वाहतूक

पुणे : कात्रज ते शिंदेवादी दरम्यान कात्रज घाटात रस्त्याच्या मजबूती करणाचे आणि डांबरीकरणाचे काम सुरू करण्यात येणार आहे. या कामामुळे ३१ डिसेंबर पर्यन्त या घाटातून एकेरी वाहतूक सुरू राहणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत. नागरिकांची याची दखल घेऊन या मार्गाने प्रवास करावा असे आवाहन करण्यात येणार आहे.

कात्रज शिंदेवाडी रस्ता राज्य मार्ग क्र. १२६ जुना कात्रज घाट हा १२ किमी लांबीच्या घाट रस्त्याचे तसेच डांबरी पृष्ठभागाचे मजबुतीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. ही काम करण्यास महिन्याचा अवधी लागणार आहे. त्यामुळे पुणे ते सातारा अशी कात्रज घाटतून एकेरी वाहतुक सुरु ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. वाहनधारकांनी साताऱ्याकडून पुण्याकडे येताना नवीन बोगद्यातून यावे, असे आवाहन करन्यात आले आहे. ३१ डिसेंबरपर्यंत सातारा ते पुणे जुना कात्रज घाट रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. ही वाहतूक नवीन बोगद्यातून पुण्याकडे वळविण्यात आहे.

जुना कात्रज घाट रस्त्याच्या डांबरी पृष्ठभागाचे मजबुतीकरणाचे काम सुरु असल्याने दुहेरी वाहतुकीमुळे वाहतूक कोंडी व अपघाताची शक्यता असल्याने घाटातून एकरी वाहतूक केली जाणार आहे. साताराकडून येणारी वाहतूक नवीन बोगद्यातून दरीपूल मार्गे पुण्याकडे वळविण्यात आली आहे. पुणे मोटार वाहन कायदा १९८८ व गृह विभागाच्या १९ मे १९९० च्या अधिसूचनेनुसार जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी हे आदेश दिले आहेत.

 

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या

विभाग