मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune: पुण्यात शिक्षकांची विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण; व्हिडिओ पाहून नेटकरी संतापले

Pune: पुण्यात शिक्षकांची विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण; व्हिडिओ पाहून नेटकरी संतापले

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Jan 22, 2023 11:17 AM IST

Pune Junnar Teacher Beats Student Video Goes Viral: पुण्याच्या जुन्नर येथे महाविद्यालयातील शिक्षकांनी विद्यार्थ्यांला लाथाबुक्यांनी मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

Teachers Beats Student
Teachers Beats Student

Teacher Beats Student Video Goes Viral: पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातील आळेफाटा येथील शिक्षकांनी अकरावीच्या विद्यार्थ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे.शिक्षकांना शेरोशायरी केल्याने झालेल्या गैरसमजातून काही शिक्षकांनी विद्यार्थ्याला अमानुषपणे मारहाण केल्याचे सांगितले जात आहे. विद्यालयाच्या प्रशासनाने या घटनेची दखल घेतली असून, तातडीने बैठक बोलावली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी काही मुलांच्या घोळक्यातील एका मुलाने शिक्षकांना पाहून शेरोशायरी केली. याबाबत कोणताही शाहनिशा न करता शाळेतील शिक्षकांनी संबंधित विद्यार्थ्याला मारहाण केली. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये काही शिक्षक विद्यार्थ्याला केस पकडून तसेच लाथाबुक्यांनी मारहाण करताना दिसत आहेत. दरम्यान, विद्यार्थी, ‘यामध्ये माझी चुक नाही,’ अशी वारंवार विनंती करतोय. पण तरीही शिक्षक त्याला मारहाण करीत आहेत. शाळेतील एका विद्यार्थ्याने हा संपूर्ण प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर झाल्यानंतर विद्यालय प्रशासनाने या घटनेची चौकशी करण्यासाठी तत्काळ बैठक बोलावली आहे.

व्हिडिओ-

सदर घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानतंर नेटकरी संताप व्यक्त करीत आहेत. काही लोकांनी विद्यार्थ्यानेच काहीतरी चूक केली असेल म्हणून शिक्षकांनी मारहाण केल्याचे बोलत आहेत. तर, काहींनी विद्यार्थ्यांची चूक असेल तर शिक्षा नक्कीच झाली पाहीजे. परंतु , लाथाबुक्क्यांनी मारहाण करणे नक्कीच योग्य नाही असे म्हणत नाराजी व्यक्त केली आहे.

IPL_Entry_Point

विभाग