मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Weather : पुणे गारठले! ऑक्टोबरमधील दहा वर्षांतील सर्वात निचांकी तापमान

Pune Weather : पुणे गारठले! ऑक्टोबरमधील दहा वर्षांतील सर्वात निचांकी तापमान

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Oct 31, 2022 03:14 PM IST

Pune weather News : पावसानंतर आता पुण्यात थंडीचा कडाका वाढला आहे. गेल्या काही दिवसांपासून तापमानात मोठी घट झाली आहे. रविवारी तब्बल १२ अंश सेल्सिअस इतक्या कमी तापमानाची नोंद झाली आहे.

पुण्यात तापमानात घट
पुण्यात तापमानात घट

पुणे: काही दिवसांपूर्वी पुण्यात पावसाने थैमान घातले होते. आता पाऊस माघारी फिरल्यानंतर आता पुण्यात थंडीचा कडाका वाढला आहे. गेल्या पाच दिवसांपासून पुण्यात तापमानात मोठी घट झाली आहे. रविवारी तब्बल १२ अंश सेल्सिअस इतक्या निचांकी तापमानाची नोंद झाली आहे. राज्यातील हे सर्वात कमी तापमान होते. हे तापमान येत्या आठवडाभर कायम राहणार आहे, असा अंदाज हवामान खात्याने नोंदवला आहे.

पुण्यात ५ दिवसांपासून रात्रीच्या तापमानात मोठी घट झाली आहे. वाढत्या थंडीमुळे पुणे गारठले आहे. तापमानातील ही घट २३ ऑक्टोबरपासून आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि जिल्ह्यात ग्रामीण भागात रात्रीच्या वेळी पडत असलेल्या थंडीपाऊन बचाव करण्यासाठी लोक शेकोट्या पेटवू लागले आहे. मान्सून परतला आहे. वातावरण कोरडे झाले असून या मुळे गारठा वाढला असल्याचे पुणे वेधशाळेने सांगितले आहे. यामुळेच रोज तापमानात घट होत असून रविवारी हंगामातील सर्वात निचांकी तपमानाची नोंद झाली आहे.

हिवाळच्या सुरवातीलाच एवढ्या निचांकी तापमानाची नोंद झाली आहे. या हंगामातील हे सर्वात कमी तापमान होते. गेल्या दहा वर्षांतील हे सर्वात कमी तापमान नोंदवले गेले आहे. २०१६ मध्ये ३० तारखेला १२.० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. त्यानंतर काल रविवारी देखील पाच वर्षांतील तापमानाचा नीचांक नोंदविला गेला. २०१२, २०१८ आणि २०२१ या तीन वर्षांतही ३० ऑक्टोबरला सर्वात कमी तापमानाची नोंद करण्यात आली होती. पुण्यात ऑक्टोबरमधील आजवरचे सर्वांत नीचांकी किमान तापमान १९६८ मध्ये २९ तारखेला ९.४ अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले होते. त्यानंतर काल सर्वात कमी तापमान नोंदवण्यात गेले होते.

पुण्यात २४ तारखेला १४.४ अंश सेल्सिअस, २५ ला १३.८ अंश सेल्सिअस, तर २६ आणि २७ तारखेला १४.३, २८ ला १३.८ अंश सेल्सिअस, २९ ऑक्टोबरला १३.३ अंश सेल्सिअ तर रविवारी ३० तारखेला तब्बल १२.६ अंश सेल्सिअसपर्यंत हे तापमान खाली आहे.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या

विभाग