मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  pune rain update : खडकवासला धरणातून विसर्ग वाढवला; नदीपत्रातील वाहने काढण्याचे जलसंपदा विभागाचे आवाहन

pune rain update : खडकवासला धरणातून विसर्ग वाढवला; नदीपत्रातील वाहने काढण्याचे जलसंपदा विभागाचे आवाहन

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Aug 19, 2022 08:09 PM IST

पुण्यात खडकवासला धरण साखळीत सुरू असलेल्या पावसामुळे पानशेत आणि वरसगाव धरणातून विसर्ग वाढवण्यात आला आहे.

खडकवासला धरण
खडकवासला धरण

पुणे : पुण्यात खडकवासला धरण साखळीत सुरू असलेल्या पावसामुळे पानशेत आणि वरसगाव धरणातून विसर्ग वाढवण्यात आला आहे. यामुळे खडकवासला धारणातूनही मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू करण्यात आला आहे. यामुळे पुन्हा भिडे पुल हा पाण्याखाली जाणार असून नागरिकांनी नदी पात्रात लावलेली त्यांची वाहने काढण्याचे आवाहन जलसंपदा विभागाने केले आहे.

पुण्यात धरण परिसरात पावसाची संतंत धार ही सुरच आहे. यामुळे खडकवासला धरण साखळीतील पानशेत, वरसगाव, टेमघर आणि खडकवासला धरण हे १०० टक्के भरले आहे. यामुळे, वरसगाव धरणाच्या सांडव्यावरून नदीपात्रामध्ये सुरू असणारा २ हजार ३४६ क्यूसेक विसर्ग वाढवून सायं.७ वाजता ५ हजार ७१० क्यूसेक करण्यात येत आहे.

तर, खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा विसर्ग वाढवून सायं. ७ वाजता ८ हजार ५६० क्यूसेक करण्यात येत आहे. पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानूसार विसर्ग पुन्हा कमी/जास्त करण्याची शक्यता आहे. नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये आणि दक्षता घ्यावी, असे आवाहन सहायक अभियंता यो.स.भंडलकर यांनी केले आहे.

IPL_Entry_Point

विभाग