मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Chhatrapati Sambhajinagar: औरंगजेबचं पोस्टर झळकावणं पडलं महागात; आरोपींविरोधात पोलिसांची मोठी कारवाई
Chhatrapati Sambhajinagar vs Aurangabad
Chhatrapati Sambhajinagar vs Aurangabad (HT)

Chhatrapati Sambhajinagar: औरंगजेबचं पोस्टर झळकावणं पडलं महागात; आरोपींविरोधात पोलिसांची मोठी कारवाई

05 March 2023, 17:36 ISTAtik Sikandar Shaikh

Chhatrapati Sambhajinagar : औरंगाबादच्या नामांतराविरोधात एमआयएमनं आंदोलन सुरू केलं आहे. आंदोलनात एका तरुणानं औरंगजेबचे पोस्टर झळकावल्याप्रकरणी आता पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.

Chhatrapati Sambhajinagar vs Aurangabad : शिंदे-फडणवीस सरकारनं पाठवलेल्या औरंगाबाद शहराच्या नामांतराला केंद्रीय गृहमंत्रालयानं ग्रीन सिग्नल दिला आहे. त्यानंतर आता प्रशासनाकडून जिल्ह्याच्या नामांतराची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू झाली आहे. परंतु खासदार इम्तियाज जलील यांनी जिल्ह्याच्या नामांतराला विरोध करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केलं आहे. एमआयएमच्या नामांतर विरोधी आंदोलनात एका तरुणानं मुघल शासक औरंगजेबचे पोस्टर्स झळकावल्यामुळं त्यावरून मोठं राजकीय वादंग पेटलं आहे. त्यातच आता संभाजीनगर पोलिसांनी औरंगजेबचे पोस्टर्स झळकावणाऱ्या अज्ञात आरोपींविरोधात मोठी कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

छत्रपती संभाजीनगर शहरात एमआयएमने केलेल्या आंदोलनावेळी औरंगजेबचे पोस्टर्स झळकावणाऱ्या तरुणांविरोधात पोलिसांनी कलम १५३ अ नुसार गुन्हा दाखल करत त्यांच्या अटकेची कार्यवाही सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. सिटी पोलीस चौक पोलिसांनी चार अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे. त्यामुळं आता एमआयएमच्या आंदोलनात औरंगजेबचे पोर्टर्स झळकावणाऱ्या आरोपींवर पोलिसांकडून कठोर कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. औरंगाबादचं नामांतर झाल्यानंतर एमआयएमने केलेल्या आंदोलनावेळी औरंगजेबचे पोस्टर्स झळकावल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर त्यावरून राजकीय वादंगही पेटलं होतं. त्यानंतर आता पोलिसांनी या प्रकरणात कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

आरोपींशी आमचा काहीही संबंध नाही- खासदार जलील

औरंगाबादच्या नामांतराविरोधात आंदोलनावेळी ज्या तरुणांनी औरंगजेबचे पोस्टर्स झळकावले आहे, त्या लोकांशी आमचा काहीही संबंध नसल्याचं स्पष्टीकरण छत्रपती संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलील यांनी दिलं आहे. शहराच्या नामांतराविरोधात जलील यांच्या उपोषणाचा आजचा दुसरा दिवस असून एमआयएमच्या नेत्यांसह अनेक कार्यकर्तेदेखील उपोषणास बसलेले आहेत. त्यामुळं आता औरंगाबादच्या नामांतरावरून पुन्हा राजकीय वादंग पेटण्याची शक्यता आहे.