मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Satyajit tambe: नाशिकमध्ये महाआघाडीला मोठा धक्का; सत्यजित तांबेंचा दणदणीत विजय, शुभांगी पाटील पराभूत

Satyajit tambe: नाशिकमध्ये महाआघाडीला मोठा धक्का; सत्यजित तांबेंचा दणदणीत विजय, शुभांगी पाटील पराभूत

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Feb 02, 2023 11:24 PM IST

Nashik graduate constituency election result : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघात अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. महाआघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांना जवळपास ३० हजार मतांच्या अंतराने पराभव पत्करावा लागला आहे.

सत्यजित तांबेंचा दणदणीत विजय
सत्यजित तांबेंचा दणदणीत विजय

Nashik graduate constituency election result : निवडणुकीची अधिसूचना जारी झाल्यापासून व उमेदवारी अर्ज भरण्यापासून संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरलेल्या नाशिक  पदवीधर मतदार संघाचे मैदाना अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांनी मारले आहे. तांबे यांचा दणदणीत विजय झाल्याने नाशिकमध्ये महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. महाविकास आघाडीचा पाठिंबा असलेल्या शुभांगी पाटील यांचा दारुण पराभव झाला आहे. 

नाशिक पदवीधर मतदारसंघात निवडणुकीत अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांनी विजय मिळवला असून महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांना दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. काँग्रेसमधून बंड करत सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर संपूर्ण राज्याचं लक्ष या निवडणुकीच्या निकालावर लागले होते. 

नाशिकमध्ये आपलाच विजय होईल, असं महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून तसेच उमेदवार शुभांगी पाटील यांच्याकडून वारंवार सांगण्यात येत होतं. मात्र, निवडणुकीत सत्यजित तांबे यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांचा पराभव केला आहे. तसे पाहिले तर सुरुवातीपासूनच तांबे यांचे पारडे जड असल्याचे मानले जात होते. सत्यजित तांबे यांनी पाचव्या फेरीअखेर एकूण ६८ हजार ९९९ मतं मिळवली आहे. तर शुभांगी पाटील यांना केवळ ३९ हजार ५३४ मतांवर समाधान मानावं लागलं आहे. पाटील यांचा तब्बल २९ हजार ४६५ मतांनी  दारूण पराभव झाला आहे. 

तांबे यांचा मतदारसंघात मोठा जनसंपर्क व भाजपचा छुपा पाठिंबा हे त्यांच्या विजयाचे गुपीत असल्याचे मानले जात आहे. सत्यजित तांबे विजयी होताच त्यांच्या कार्यकर्त्यांनी मतमोजणी केंद्राबाहेर जल्लोष केला. नाशिकमध्ये सत्यजित तांबे यांच्या विजयाने महाविकास आघाडीला तसेच काँग्रेसच्या बाळासाहेब थोरातांना मोठा धक्का बसला आहे.

IPL_Entry_Point