Mumbai Crime: मुंबईच्या वरळी सी फेसवर रविवारी भरधाव कारने मॉर्निंग वॉकला गेलेल्या एका महिलेला चिरडले. या अपघात गंभीर जखमी झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी वरळी पोलिसांनी आरोपी कारचालकाला ताब्यात घेतले आहे. मात्र, या घटनेने वरळीतील नागरिकांमध्ये संतपाची लाट उसळली आहे. दरम्यान, अशा प्रकारचे अपघात रोखण्यासाठी आज पहाटे मॉर्निंग वॉकसाठी निघलेल्या नागरिकांनी थेट वरळी पोलीस ठाण्यासमोर आंदोलन पुकारले.
राजलक्ष्मी राजकृष्णन असे अपघात मरण पावलेल्या महिलेचे नाव आहे. राजलक्ष्मी या रविवारी सकाळी ६.३० वाजताच्या सुमारात एका भरधाव कारने त्यांना चिरडले. या अपघातात राजलक्ष्मी गंभीर जखमी झाला. स्थानिक आणि पोलिसांच्या मदतीने तिला नायर रुग्णालयात हलवण्यात आले. तेथील डॉक्टरांनी त्यांची तपासणी करून महिलेला मृत घोषित केले.
सुमेर मर्चंट (वय, २३) असे आरोपी चालकाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी कारचालकाविरोधात बेदरकारपणे वाहन चालवल्याचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. आरोपीलाही अपघातात दुखापत झाली आहे. आरोपी मैत्रीणीला सोडून परत येताना त्याच्या कारला अपघात झाला आहे. वरळी पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याने दारूचे सेवन केले होते का ते तपासण्यासाठी त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे.