मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Accident : घाटकोपरमध्ये भीषण अपघात.. ओला चालकाने ८ जणांना उडवले, अनेक वाहनांना धडक
घाटकोपरमध्ये भीषण अपघात
घाटकोपरमध्ये भीषण अपघात

Mumbai Accident : घाटकोपरमध्ये भीषण अपघात.. ओला चालकाने ८ जणांना उडवले, अनेक वाहनांना धडक

21 September 2022, 17:34 ISTShrikant Ashok Londhe

घाटकोपरमध्ये भरधार ओला चालकाने (ola driver) अनेक वाहनांना धडक देत आठ जणांना उडवले आहे. जखमींमध्ये काही विद्यार्थीही आहे. त्यांच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मुंबई –घाटकोपरमध्ये भरधार ओला चालकाने (ola driver) अनेक वाहनांना धडक देत आठ जणांना उडवले आहे. जखमींमध्ये काही विद्यार्थीही आहे. घाटकोपरमधील (Ola driver hit eight people in ghatkopar) सुधा पार्क परिसरात दुपारी एक वाजण्याच्या सुमारास हाभीषण अपघात घडला. बेधुंद गाडी चालवणाऱ्या ओला चालकाने तीन रिक्षा, एक टेम्पो आणि दोन मोटारसायकलींना धडक दिली. यात आठ जण जखमी झालेअसून जखमींमध्ये ३ विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. त्यांना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान ओला चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

ओला चालक गाडी चालवत असताना नशेत होता की गाडीत तांत्रिक बिघाड झाला होता, त्याचा गाडीवरचा थाबा सुटला की आणखी काही वेगळं कारण होतं? याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही.  पण या घटनेमुळे घाटकोपरमध्ये खळबळ उडाली आहे.

राजू यादव असं या ओला चालकाचं नाव असून तो घाटकोपरमधील कामराजनगरमध्ये राहतो, अशी माहिती मिळाली आहे. आज दुपारी सुधा पार्क परिसरात गाडी चालवत असताना अचानकपणे त्याच्या गाडीने वेग घेतला. यावेळी रस्त्यावर जी वाहनं येतील, जे व्यक्ती येतील त्यांना उडवत तो महामार्गाच्या दिशेने गेला. धडक दिली त्यावेळी रस्त्यावर विद्यार्थी देखील होते.

 

या चालकाने रस्त्याने शाळेत चालत जाणाऱ्या लहान मुलांनादेखील सोडलं नाही. त्यामुळे त्याच्याविरोधात रोष व्यक्त केला जातआहे. पोलिसांनी संबंधित प्रकरणाची दखल घेवून ओला चालकाला ताब्यात घेतलं आहे.