मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Vinayak Mete : तासभर गाडीत तडफडत होते विनायक मेटे; ड्रायव्हरनं आरडाओरड केली अन्...

Vinayak Mete : तासभर गाडीत तडफडत होते विनायक मेटे; ड्रायव्हरनं आरडाओरड केली अन्...

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Aug 14, 2022 09:09 AM IST

Vinayak Mete Passed Away : आज पहाटे साडेपाच वाजता शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांचं कार अपघातात निधन झालं आहे.

Vinayak Mete Passed Away In Car Accident
Vinayak Mete Passed Away In Car Accident (HT)

Vinayak Mete Passed Away In Car Accident : शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष आणि पाचवेळा विधानपरिषदेचे आमदार राहिलेले विनायक मेटे यांचं आज पहाटे कार अपघातात निधन झालं आहे. जेव्हा त्यांचा अपघात झाला तेव्हा त्यांना एक तास कोणतीही वैद्यकीय मदत मिळाली नसल्यानं त्यांचं घटनास्थळीच निधन झाल्याचं नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयातील डॉक्टरांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. मराठा आरक्षणासंदर्भात मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या बैठकीला हजर राहण्यासाठी मेटे मुंबईत जात होते, त्यावेळी ही दुर्दैवी घटना घडली आहे.

विनायक मेटे हे कारमध्ये बसलेले असताना त्यांचे सहकारी एकनाथ कदम हे देखील त्यांच्यासोबत होते. ते माध्यमांशी बोलताना म्हणाले की, आम्ही मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरून प्रवास करत असताना पनवेल ते खालपूर दरम्यानच्या माडप बोगद्याजवळ एका ट्रकनं आमच्या गाडीला कट मारला. त्यानंतर कारला गंभीर अपघात झाला. आम्ही मेटेंना तात्काळ उपचार मिळावा म्हणून आम्ही अनेकवेळा १०० या नंबरवर कॉल करण्याचा प्रयत्न केला, परंतु कॉन्टॅक्ट होऊ शकला नाही, असं कदम यांनी सांगितंल. याशिवाय कारच्या ड्रायव्हरनंही आरडाओरड करत अनेकवेळा स्थानिकांना आवाज देण्याचा प्रयत्न केला, पण मदत मिळाली नसल्याची माहिती मिळत आहे.

नेमकं काय झालं?

अपघात झाल्यानंतर मेटेंचा उपचार व्हावा, यासाठी मी प्रत्येक वाहनधारकाला विनंती करत होतो, परंतु अनेक गाड्यांना हात दाखवूनही कुणीही गाडी थांबवली नाही, त्यांना दवाखान्यात नेण्यासाठी एखादी गाडी थांबावी, यासाठी मी रोडवर झोपलो होतो, असंही मेटेंचे सहकारी एकनाथ कदम यांनी सांगितलं.

<p><strong>Vinayak Mete Passed Away In Car Accident</strong></p>
Vinayak Mete Passed Away In Car Accident (HT)

त्यानंतर एका व्यक्तीनं गाडी थांबवली, त्यावेळी मेटे माझ्याशी बोलत होते, परंतु त्यानंतर एक तासानं त्या ठिकाणी रुग्णवाहिका आली, त्यावेळी मेटेंना नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पहाटे झालेल्या या कार अपघातात मेटेंचे सहकारी एकनाथ कदम, मेटेंचे अंगरक्षक आणि गाडीच्या ड्रायव्हरला किरकोळ दुखापत झाली होती.

आता विनायक मेटे यांच्या कार अपघाताचे काही फोटोही समोर येत असून कारची स्थिती पाहती मेटेंना कशा प्रकारे मार लागला असेल, याचा अंदाज येत आहे. मेटेंच्या गाडीचा डावा भाग चक्काचूर झाला आहे. अपघातात मेटेंना डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर त्यांच्यावर एमजीएम रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू करण्यात आले होते.

कोण होते विनायक मेटे?

-शिवसंग्राम पक्षाचे संस्थापक अध्यक्ष

-राज्यातील मराठा आरक्षणाच्या आंदोलनातील प्रमुख चेहरा

-मराठा आरक्षणासाठी मेटेंचा अनेक आंदोलनांत सहभाग

-पाच टर्म विधानपरिषदेचे आमदार

-अरबी समुद्रात बांधण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारक समितीचे अध्यक्ष

-भाजप आणि शिवसेना युती सरकारच्या काळात पहिल्यांदा आमदार

 

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या